बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ : लोकतांत्रिक जनता दल होणार राजद (RJD) पक्षात विलीन !

बिहार  :  बिहारच्या राजकारणात रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नितीश कुमार (nitish kumar) विरूध्द भाजप (bjp) हा संघर्ष  पुन्हा तापू लागला आहे. अश्यातच विरोधक असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) गोटातून एक मोठी घडामोड समोर आली आहे.

बिहारच्या राजकीय पटावर जेष्ठ नेते शरद यादव (sharad Yadav) आणि लालू प्रसाद यादव (Laku Prasad Yadav) या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद यादव लोकतांत्रिक जनता दल या पक्षाचे अध्यक्ष आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात शरद यादवांच्या पक्षाचे विलीनीकरण होणार आहे. (Major political upheaval in Bihar, Loktantrik Janata Dal to merge with RJD party)

गेल्या वर्षी लालू यादव आणि शरद यादव यांची दिल्लीच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली होती. या बैठकीत राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षाचे नेते ऐकमेकांची प्रशंसा करत होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) यांनी जेष्ठ नेते शरद यादव यांची भेट घेतली होती. त्यात पक्ष विलीनीकरणावर शिक्कामोर्तब झाले. येत्या 20 मार्च रोजी शरद यादव यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पक्ष विलीनीकरणाचा कार्यक्रम होणार आहे.

शरद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलात विलीन होणार असल्याने बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. राष्ट्रीय जनता दलाची ताकद वाढणार आहे.