जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Mawsinram Heavy rain । एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी, पावसाने दमदार हजेरी न लावल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाचे सर्व अंदाज खोटे ठरले आहेत. मात्र दुसरीकडे एकाच दिवसात तब्बल 1000 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे मेघालयातील (meghalay) मावसिनराममधुन समोर आले आहे. (Mawsinram rainfall, Mawsinram Heavy rain, Mawsinram sets news June rainfall record 1003 mm of rain fell in 24 hours)
महाराष्ट्राचा बहुतांशी भाग मान्सूनने व्यापला आहे, मात्र अजूनही महाराष्ट्रात दमदार पाऊस होताना दिसत नाही, तर दुसरीकडे मात्र गेल्या काही दिवसांपासून आसाम आणि मेघालया पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून चेरापुंजीची (Cherrapunji) ओळख असली तरी मेघालयधील मावसिनराममध्ये (Mawsinram) 24 तासांत रेकॉर्डब्रेक 1003 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील पन्नास ते साठ वर्षातील एका दिवसातील सर्वात मोठ्या पावसाची ही नोंद आहे.
भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून चेरापुंजीची (Cherrapunji) ओळख आहे. मात्र यंदाचे चित्र वेगळे आहे. गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता ते शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता या 24 तासात चेरापुंजी मध्ये 972 मिलिमीटर तर मावसिनराममध्ये 1003 मिलीमीटर पाऊस पडला.
मावसिनराम आणि चेरापूंजी ही ठिकाणे मेघालयाच्या (meghalay) पूर्व भागात असलेल्या खासी हिल्स (Khasi Hills) जिल्ह्याच्या दक्षिण किनाऱ्यावर आहेत. हा भाग बंगालच्या उपसागरातून (Bay of Bengal) येणाऱ्या आर्द्रतेचे अभिसरण वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे या दोन ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) बरसलेला आहे. प्रमाणाच्या तुलनेत चेरापूंजी हे तीन नंबरवर असले तरी मावसिनरामला बरसलेला पाऊस हा लक्षवेधी ठरला आहे.