दिल्ली : Nbe edu NEET SS 2021 : राष्ट्रीय परीक्षा मंडळामार्फत डाॅक्टर ऑफ मेडिसिन (MD) आणि मास्टर ऑफ सर्जरी (Master of Chirurgiate MCH) च्या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या नीट सुपर स्पेशालिटी (NEET SS 2021) परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. National Board of Examination, NBE च्या अधिकृत संकेतस्थळावर nbe.edu.in वर हा निकाल पाहता येणार आहे.
राष्ट्रीय परीक्षा मंडळामार्फत 10 जानेवारी रोजी देशभरात परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी मंडळाच्या वेबसाईटवर nbe.edu.in जाऊन आपला ॲप्लीकेशन क्रमांक आणि पासवर्ड टाकून लाँग इन करू शकता.निकालात रोल नंबर आणि 400 गुणांपैकी मिळालेले गुण आणि मेरीट रँकचा समावेश असेल.
NEET SS 2021 चे कट ऑफ पर्सेंटाईल सर्व प्रवर्गासाठी 50 आहे. या परीक्षेत उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक उत्तरासाठी 4 गुण असतील तर चुकीच्या उत्तरासाठी 25 टक्के गुण कापले जाणार आहेत.
ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शासकीय आणि खाजगी महाविद्यालये तसेच अभिमत विद्यापीठ तसेच आर्म्ड फोर्सेस मेडिकल संस्थांमध्ये डाॅक्टर ऑफ मेडिसिन (MD) आणि मास्टर ऑफ सर्जरी (Master of Chirurgiate MCH) च्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो.