India Post Payment Bank Pan Card Scam : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांनो पॅनकार्ड अपडेट करताय तर सावधान, अन्यथा पश्चाताप अटळ, पॅनकार्ड स्कॅमरपासून सुरक्षित कसे रहायचे ? जाणून घ्या
India Post Payment Bank Pan Card Scam : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (IPPB) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांनी त्यांचे पॅनकार्ड तपशील अपडेट न केल्यास त्यांचे बँक खाते २४ तासाच्या आत ब्लाॅक केले जातील असे संदेश पाठवून बँकेच्या ग्राहकांसोबत सायबर गुन्हेगारांकडून स्कॅम (Scam) केला जात आहे. या स्कॅममध्ये (PAN Card) पॅनकार्ड धारकांना अधिक लक्ष्य केले जात आहे. अश्या प्रकारच्या फसवणुकीचे अनेक प्रकरणे समोर आल्याने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांनी सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.
सायबर गुन्हेगारांनी आर्थिक फसवणूक करण्यासाठी आपला मोर्चा आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांकडे वळवला आहे. सध्या स्कॅमरकडून या बँकेच्या ग्राहकांना पॅन कार्ड अपडेट्स संदर्भात फोन काॅल, इमेल किंवा मेसेज पाठवून घाबरवून टाकले जात आहे. बँकेच्या खात्याशी पॅनकार्ड अपडेट न केल्यास २४ तासाच्या आत तुमचे बँक खाते ब्लाॅक करण्यात येईल अशी भिती दाखवली जात आहे. (India Post Payment Bank Pan Card Scam)
स्कॅमरचा खरा खेळ येथूनच सुरु होतो. बँकेच्या ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात एक लिंक पाठवून ती ओपन करण्यास सांगितली जात आहे.ती लिंक ओपन केल्यास फसव्या वेबसाईटवर आपण जातो. या वेबसाईटच्या माध्यमांतून बँकेच्या ग्राहकांची संवेदनशील माहितीचे तपशिल जमा केले जात आहेत. यामध्ये पॅन कार्ड नंबर, आधार नंबर, बँक खाते नंबरअ पडेट करून ओटीपी देण्यास सांगितले जात आहे. (India Post Payment Bank Pan Card Scam)
भारतातील नागरिक सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांचे मोठ्या प्रमाणात शिकार होत आहेत, आता “इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक” (IPPB) च्या ग्राहकांना लक्ष्य करणारे स्कॅम समोर आले आहेत. या स्कॅममध्ये विशेषत: PAN कार्ड धारकांना लक्ष्य केले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता वाढली आहे. बँकेचे अनेक ग्राहक फिशिंग घोटाळ्याला बळी पडले आहेत. पॅन कार्डचा वापर करून बँकेच्या ग्राहकांच्या खात्यातील पैश्यांवर डल्ला मारला जात आहे. तुम्हालाही असा मेसेज, काॅल किंवा इमेल आला असेल तर अत्ताच सावध व्हा. कोणत्याही अनोळखी नंबरवर किंवा लिंकवर आपली संवेदनशील माहिती शेअर करू नका, असे अवाहन IPPB अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने केले आहे. (India Post Payment Bank Pan Card Scam)
Pan Card Scam : पॅन कार्ड घोटाळा काय आहे ?
स्कॅमर्स विविध पद्धतींनी नागरिकांची माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक सामान्य स्कॅम असा आहे की, ग्राहकांना फोनवरून किंवा SMS द्वारे एक लिंक येते ज्यामध्ये त्यांना त्यांच्या PAN कार्डची किंवा बँक खात्याची माहिती अपडेट करण्याचा आग्रह केला जातो. हे फोन कॉल्स किंवा संदेश बँकेच्या अधिकृत संदेश म्हणून दिसू शकतात, पण हे स्कॅमर्सकडून असतात. ते PAN कार्डसाठी चुकीच्या लिंकवर नेऊन वापरकर्त्यांचा डेटा चोरतात. (India Post Payment Bank Pan Card Scam)
पॅन कार्ड स्कॅमरपासून सुरक्षित कसे रहायचे ?
- कधीही लिंकवर क्लिक करू नका : तुम्हाला कोणत्याही अज्ञात नंबर किंवा संदेशाद्वारे लिंक पाठवली जात असेल, तर ती लिंक क्लिक करू नका. अधिकृत संदेश किंवा ईमेलमध्येही तुम्हाला लिंक दिली तरी, ती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरूनच उघडा.
- बँकेच्या अधिकृत क्रमांकावरच संपर्क करा : कधीही तुमच्या बँकेच्या कॉल सेंटरला संपर्क करण्याची आवश्यकता असेल, तर फक्त त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरील नंबरवर संपर्क करा. अज्ञात नंबरवरून आलेल्या कॉल्सना उत्तर देणे टाळा.
- अधिकृत माहिती मिळवा : तुमच्या बँकेचे, खासकरून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे, नियमित अपडेट्स पाहण्यासाठी त्यांचे अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्स वापरा.
- तुमच्या खात्याचा पासवर्ड कधीही इतरांशी शेअर करू नका : बँक किंवा अन्य कोणतेही सरकारी अधिकारी कधीही तुमचा पासवर्ड विचारत नाहीत. तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारच्या मागण्या आल्यास, त्वरित त्याकडे दुर्लक्ष करा किंवा याबाबत आपल्या बँकेशी संपर्क साधून याबाबतची खातरजमा करा, तुमची खात्री होत नसेल तर बँकेकडे रितसर लेखी तक्रार नोंदवा.
- फसवणूक संदर्भातील तक्रार करा : जर तुम्हाला शंका आली की तुम्ही फसवणुकीची शिकार झाले आहात, तर त्वरित आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनला किंवा सायबर क्राइम सेलला तक्रार करा.
पॅन कार्ड घोटाळ्यापासून सावध कसे रहावे ? इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची भूमिका काय ?
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक सावधानतेचा इशारा जारी केला आहे, यामध्ये म्हटले आहे की, फसवणूक करणारे आयपीपीबी ग्राहकांना एसएमएस/ईमेल पाठवून त्यांचे पॅन कार्ड तपशील आणि त्यांचे संवेदनशील बँकिंग तपशील विचारत आहेत. IPPB तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही लिंक किंवा मेसेज किंवा कॉलद्वारे शेअर करण्यास सांगत नाही.तुम्ही कधीही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये किंवा तुमच्या बँकिंगशी संबंधित कोणतीही माहिती शेअर करू नये. सावध रहा आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित बँकेकडे तक्रार करा, असे अवाहन करण्यात आले आहे. (India Post Payment Bank Pan Card Scam)