हिमाचल प्रदेशात पावसाने उडवला हाहाकार; काही कळायच्या आत इमारती कोसळल्या, पहा थरकाप उडवणारे व्हिडिओ

हिमाचल प्रदेश : महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. मात्र देशातील इतर भागात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून पावसाने नुसता हाहाकार उडवून दिला आहे. अतिवृष्टी सदृश्य पाऊस या भागात पडत असल्याने मोठ्या प्रमाणात भुस्खलन होत असल्याच्या घटना घडत आहेत. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती ढासळत असल्याच्या घटना या भागात वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

Rains wreak havoc in Himachal Pradesh, buildings collapsed within few moments, watch shocking videos

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यातील इमारती कोसळल्या आहेत. इमारती कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहीत समोर आली आहे.

अधिक माहितीनुसार, कुल्लू जिल्ह्यातील अन्नी शहरात भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली. पण भूस्खलानाचा अंदाज आधीच आल्यामुळे सदर परिसरातील इमारती प्रशासनाकडून रिकाम्या करण्यात आल्या होत्या त्यामुळे जिवितहानी टळली आहे. तर डोंगर उतारावर असल्यामुळे अनेक घरे एकाच वेळी कोसळल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Rains wreak havoc in Himachal Pradesh, buildings collapsed within few moments, watch shocking videos

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. याआधीसुद्धा मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता. त्याचबरोबह अनेक घरे, दुकाने, गाड्या वाहून गेल्या होत्या. व्यास नदीवरील पूल तुटणे, पूर्ण रस्ता पुराच्या पाण्याच्या जोरामुळे वाहून जाणे अशा घटना घडल्या होत्या. आताच्या संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन घरे कोसळली आहेत.

पहा थरकाप उडवणारे व्हिडिओ