Tamil Nadu Army helicopter crash | तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेप्रकरणी राजकीय वर्तुळातून येऊ लागल्या प्रतिक्रिया
तामिळनाडू : Tamil Nadu Army helicopter crash | तामिळनाडूतील कन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत हे आपल्या पत्नी व इतर 14 लष्करी अधिकाऱ्यांसोबत प्रवास करत होते. या घटनेप्रकरणी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू असून या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तामिळनाडू घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर माहिती दिली.
तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेची बातमी समजताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, CDS बिपीन रावतजी प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरची दुर्घटना झाल्याची समजल्यानंतर धक्काच बसला आहे. प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो.
Shocked to hear about the tragic crash of helicopter with CoDS Shri Bipin Rawat ji on board.
I pray for everyone's safety, wellbeing.— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 8, 2021
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी सुध्दा या घटनेप्रकरणी ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि हेलिकॉप्टरमधील इतरांच्या सुरक्षेची आशा आहे.लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.
Hoping for the safety of CDS General Bipin Rawat, his wife and others onboard the chopper.
Prayers for speedy recovery.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 8, 2021
काय आहे घटना ?
तामिळनाडूतील कन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे १४ अधिकारी होते. आतापर्यंत ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, जे गंभीररित्या जळालेले आहेत अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे
News of crash of the helicopter carrying CDS Bipin Rawat ji, his family members and other personnel came as a shock!
My prayers are with them all.— Vasundhara Raje (@VasundharaBJP) December 8, 2021
अपघातानंतर सुमारे एक तासानंतर, जनरल रावत यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती देण्यात आली असली तरी, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. या अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. जनरल बिपिन रावत यांनी ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांनी १ जानेवारी २०२० रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला.
Received the news of an Army helicopter crash carrying CDS General Shri Bipin Rawat Ji and other senior Army officials in Tamilnadu. I am praying for their well-being and good health.
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) December 8, 2021
ANI या वृत्तसंस्थेनुसार, हेलिकॉप्टर सुलूर एअरबेसवरून वेलिंग्टनला जात होते. घटनास्थळी डॉक्टर, लष्कराचे अधिकारी आणि कोब्रा कमांडोचे पथक उपस्थित आहे. जळालेले मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
डोंगराच्या खाली आणखी काही मृतदेह दिसत आहेत. समोर आलेल्या अपघाताच्या व्हिज्युअल्समध्ये हेलिकॉप्टर पूर्णपणे खराब झालेले दिसत आहे आणि त्याला आग लागली आहे. गेल्या महिन्यात MI-17 देखील क्रॅश झाले होते, त्यातील सर्व १२ जण ठार झाले होते.
कुन्नूर में सेना के हैलिकॉप्टर के हादसे की ख़बर देश के लिए बेहद चिंतनीय एवं दुखद है। सभी के सुरक्षित जीवन के लिए हृदय से प्रार्थना।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) December 8, 2021
प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपिन रावत आपल्या पत्नीसोबत उटी येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार होते.आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वायु सेनेने दिले चौकशीचे आदेश
या संदर्भात भारतीय वायु सेनेनं ट्वीट केलं असून यात ‘CDS जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरचा तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ आज अपघात झाला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.’ असं म्हटलं आहे.
हे अधिकारी करत होते प्रवास
1- जनरल बिपीन रावत
2- मधुलिका रावत
3- ब्रिगेडियर एल. एस. लिडर
4- लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
5- नाईक गुरुसेवक सिंग
6- नायक जिंतेंद्र कुमार
7- लान्स नायक विवेक कुमार
8- लान्स नायक बी. साईतेजा
9- हवालदार सतपाल