Sarfaraz Khan england test : सर्फराज खानचे भारतीय कसोटी संघात पदार्पण,इंग्लंड विरूध्द झळकावले अर्धशतक,हा क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद – सर्फराज असं का म्हणाला ?

Sarfaraz Khan england test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी (IND vs ENG test) सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवस अखेर 5 बाद 326 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा (Rohit Sharma Ravindra Jadeja Test century) यांनी दमदार शतके ठोकली.सर्फराज खान (Sarfaraz Khan) याने भारतीय कसोटी संघात आज पदार्पण केले. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात सर्फराजने 66 चेंडूत 62 धावांची तडाखेबंद अर्धशतकीय खेळी करत सर्वांचेच लक्ष वेधले. आपली निवड योग्य असल्याचे त्याने आजच्या खेळीतून सिध्द केले.

Sarfaraz Khan england test, Sarfraz Khan's debut in Indian Test team, half century against England, this moment is proud for me - Why did Sarfraz say this?

सर्फराज खान (Sarfaraz Khan england test) हा गेल्या काही हंगामापासून रणजी आणि इतर प्राथमिक श्रेणीच्या सामन्यांमध्ये धावांचा रतीब घालत होता. पण त्याची भारतीय संघात वर्णी लागत नव्हती. सर्फराजला भारतीय संघात स्थान देण्यात यावे अशी मागणीही सातत्याने व्हायची.सर्फराज खानने सतत कठोर मेहनत करत रहावं, एक ना एक दिवस त्याच्यासाठी भारतीय संघाचे दार उघडेल, असा विश्वास त्याचे वडील नौशाद खान (Naushad Khan) यांना होता.वडीलांच्या सल्ल्यानुसार सर्फराज हा सतत चांगले प्रदर्शन करत राहिला.

Sarfaraz Khan england test, Sarfraz Khan's debut in Indian Test team, half century against England, this moment is proud for me - Why did Sarfraz say this?

15 फेब्रुवारी हा दिवस सर्फराज खानच्या (Sarfaraz Khan england test) आयुष्याची स्वप्नपूर्ती करणारा ठरला.भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसर्‍या कसोटी सामन्यात सर्फराज खानने भारतीय संघात पुनरागमन केले.भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumbale) यांनी त्याला भारतीय संघाची कॅप भेट दिली.संघातील सर्व सहकाऱ्यांनी सर्फराजचे स्वागत केले.

Sarfaraz Khan england test, Sarfraz Khan's debut in Indian Test team, half century against England, this moment is proud for me - Why did Sarfraz say this?

राजकोट येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत सर्फराज भारतीय संघात पुनरागमन केले.हा क्षण पाहण्यासाठी सर्फराजचे वडिल नौशाद खान आणि सर्फराजची बायको मैदानात उपस्थित होते. यावेळी दोघेही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (Sarfaraz Khan england test)

Sarfaraz Khan england test, Sarfraz Khan's debut in Indian Test team, half century against England, this moment is proud for me - Why did Sarfraz say this?

“मी सहा वर्षांचा असतानापासून माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळतोय, त्यांचं स्वप्न होतं कि, मी भारतीय संघाकडून खेळावं, आज तो दिवस उगवला.मैदानावर आल्यानंतर मला खुप बरे वाटले.वडिलांची इच्छा आणि स्वप्न पुर्ण झालं. मी व माझ्या भावाच्या क्रिकेटसाठी वडिलांनी खूप मेहनत घेतलीय. भारतीय कसोटी संघातून पदार्पण करणे हा क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद आहे”

सर्फराज खान

Sarfaraz Khan england test : राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या 326 धावा, शर्मा जडेजाची शतके तर खानचे अर्धशतक

भारतीय संघाने राजकोट कसोटीत पहिल्या दिवस अखेर 326 धावा केल्या.भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल हा 10 धावांवर बाद झाला.शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो शून्यावर बाद झाला.तर रजत पाटीदार 5 धावांवर बाद झाला. सुरुवातीला भारताच्या झटपट 3 विकेट पडल्या. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने 196 चेंडूत 131 धावा करत शतक झळकावले. कसोटीत पदार्पण केलेल्या सर्फराज खानने तडाखेबंद अर्धशतकीय खेळी खेळली.तो 62 धावांवर धावबाद झाला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रविंद्र जडेजाने 212 चेंडूत 110 धावा करत शतक झळकावले. जडेजा हा नाबाद आहे. त्याच्या साथीला कुलदीप यादव हा 1 रन काढून नाबाद आहे. इंग्लंडकडून मार्कवुडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. (Sarfaraz Khan england test)