T20 World Cup 2024 America : यावर्षी अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) हा भारतीय संघाचा कर्णधार (Captain) असेल तर हार्दिक पांड्या (Vice captain – Hardik Pandya) हा उपकर्णधार असेल, तर प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड ( Coach -Rahul Dravid) यांच्याकडे कायम राहील, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jai Shah) यांनी केली.
जय शाह यांनी गतवर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे.भारतात पार पडलेल्या या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. फायनल वगळता सर्व सामने जिंकले. विजेतेपद थोडक्यात हुकले.यावर्षी अमेरिकेत होणारा टी-20 विश्वचषक जिंकण्यात रोहित शर्माचा भारतीय संघ नक्कीच यशस्वी होईल, असा आशावाद जय शाह यांनी व्यक्त केला.
रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल. राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी जय शाह म्हणाले, “आम्ही २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना हरलो असलो तरी, टीम इंडिया चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. भारताने सलग 10 सामने जिंकले. मला पूर्ण विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यंदाचा टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी होईल.
टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल हा प्रश्न आतापर्यंत कायम होता. टीम इंडियाचा प्रवास २०२२ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत संपला. यानंतर रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळत होता. पण जानेवारीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली 14 महिन्यांनंतर टी-20 संघात परतले. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यातही शतक झळकावले. तेव्हापासून, रोहित शर्मा यंदाच्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची धुरा सांभाळेल, अशी अपेक्षा होती.