T20 World Cup Indian team Announcement | T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा,धवन व चहलला डच्चू

15 सदस्यीय भारतीय संघ विश्वचषकात खेळताना दिसेल.

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या ICC T20 विश्वचषकासठीच्या भारतीय संघाची घोषणा बुधवारी भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) केली. 15 सदस्यीय भारतीय संघ अगामी विश्वचषकात खेळताना दिसेल. संघाचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे विराट कोहली करताना दिसेल.(T20 World Cup Indian team Announcement)

भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत संघाच्या निवडीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली.(T20 World Cup Indian team Announcement)

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीची बुधवारी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात बैठक पार पडली. कर्णधार विराट कोहली मँचेस्टर आणि  प्रशिक्षक रवी शास्त्री लंडनहून ऑनलाइन सामील झाले होते. त्यात नव्या संघाची घोषणा करण्यात आली.

भारतीय संघ स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यात 24 ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा पहिला सामना खेळेल हा सामना दुबईत होणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारतचा पहिला सामना असेल. 2007 च्या चॅम्पियन्सचा सामना ग्रुप 2 मधील 2 क्वालिफायर्ससह अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडशी होईल.t20 world cup 2021 india matches

भारताने युझवेंद्र चहल आणि शिखर धवन यांच्यासारख्या खेळाडूंना डच्चू दिला आहे.तर आर अश्विनला तसेच सुर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. (India dropped players like Yuzvendra Chahal and Shikhar Dhawan)

भारतीय संघात  कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना जागा मिळाली. तर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि लेगस्पिनर राहुल चाहर हे चार फिरकीपट्टू फिरकी विभाग सांभाळतील.

मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांची मुख्य वेगवान गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली.

दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांना श्रेयस अय्यरसह राखीव गटात स्थान देण्यात आले आहे.

निवडलेला भारतीय संघ असा (Indian team selected for T20 World Cup)

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी. तर राखीव खेळाडूत श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर यांचा समावेश करण्यात आला आहे.

T20 विश्वचषक भारतात होणार होता पण कोविड १९ pandemic साथीमुळे ओमान आणि यूएईमध्ये स्पर्धा घेण्यास बीसीसीआयने सहमती दर्शविली. (ICC T20 World Cup 2021 host country)