Tata Group finally take over Air India : अखेर टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतला – केंद्र सरकारची घोषणा; रतन टाटांनी केले ट्विट म्हणाले welcome back air India
दिल्ली | Tata Group finally take over Air India | बहुचर्चित एअर इंडिया (air india) कंपनीच्या विक्रीचा सरकारचा घाट आज पूर्णत्वास गेला.18 हजार कोटींच्या बोलीवर एअर इंडिया कंपनी टाटा समुहाच्या ( tata Sons) ताब्यात गेली आहे. देशातील उद्योग घराण्यांमधील (Reliable entrepreneurs in the country) सर्वाधिक विश्वसनीय अश्या टाटा समूहाकडे (Tata Group) एअर इंडियाचा पुन्हा एकदा ताबा गेला आहे. एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाच्या ताब्यात आल्यानंतर उद्योगपती रतन टाटा (ratan tata twitter) यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी वेलकम बॅक एअर इंडिया (welcome back air India) म्हटले आहे.
सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडियामधील निर्गुंतवणुकीसाठी चार कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. यातील सर्वाधिक गुंतवणुकीची टाटा समूहाने लावलेली बोली मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती केंद्र सरकारकडून आज जारी करण्यात आली. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटदेखील स्पर्धेत होते. यामध्ये टाटा सन्सने बाजी मारली. (SpiceJet was also in competition with Tata Sons. In this, Tata Sons won)
एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे गेली आहे. टाटा समूहाने एअर इंडियासाठी 18 हजार कोटींची बोली लावली. डिसेंबरच्या अखेरीपर्यंत एअर इंडियाच्या हस्तांतराचा व्यवहार पूर्ण होईल, अशी माहिती डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे आणि नागरी उड्डान मंत्रालयाचे सचिव राजीव बंसल यांनी दिली. (Tata Group finally take over Air India – Central Government announcement Ratan Tata tweet welcome back air India)
एअर इंडियाची स्थापना 1932 मध्ये टाटा समुहानेच केली होती. टाटा समुहाचे संस्थापक जे. आर. डी.टाटा यांनी याची सुरुवात केली होती. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एका राष्ट्रीय एअरलाईन्सची गरज भासू लागली आणि सरकारने एअर इंडियाची 49 टक्के भागिदारी खरेदी केली. 1953 सरकारने एअर कार्पोरेशन अॅक्टअंतर्गत एअर इंडियाची 100 टक्के भागिदारी खरेदी केली आणि एअर इंडिया सरकारी कंपनी झाली. (Tata Group founder J. R.D. Tata by founded Air India was in 1932)
गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअर इंडियावरील कर्जाचा बोजा सतत वाढत आहे. एअर इंडियावर 61 हजार 562 कोटी रुपयांचे कर्ज आहे. सरकारी खात्यानेही एअर इंडियाचे 500 कोटी रुपये थकवले आहेत. तसेच एअर इंडियाकडे एकूण 46 हजार कोटी रुपयांची संपत्ती असून यात जमीन, इमारतींचा समावेश आहे.
तोटा वाढत चालल्याने मागील 20 वर्षांपासून एअर इंडिया विकण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यावेळी 20 टक्के भाग विकण्याचा प्रयत्न होता. मात्र सरकारी अटी आणि कर्जामुळे डुबलेल्या एअर इंडियाला खरेदीसाठी कुणी पुढे येत नव्हते. तसेच 2017 मध्ये 74 टक्के भाग विकण्याचा विचार करण्यात आला होता. पुढे पूर्ण 100 टक्के कंपनी विकण्याचे निश्चित करण्यात आले.
त्यानुसार सरकारने निविदा मागविल्या होत्या. एअर इंडिया खरेदीसाठी अनेक मोठ्या कंपन्या इच्छूक होत्या. मागील आठवड्यात एअर इंडियाचा ताबा टाटा समूहाकडे गेला अश्या बातम्या आल्या होत्या परंतु केंद्र सरकारने यावर भाष्य केले नव्हते. अखेर शुक्रवारी केंद्र सरकारने एअर इंडियाच्या विक्री प्रक्रियेची अधिकृत माहिती जारी करत एअर इंडियाचा ताबा टाटा समूहाकडे गेला असल्याचे जाहिर केले. (Tata Group finally take over Air India – Central Government announcement)
दरम्यान टाटा समूहाकडे एअर इंडियाचा ताबा आल्यानंतर टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ट्विट करत वेलकम बॅक एअर इंडिया अशी पोस्ट टाकली आहे. (Ratan Tata tweet welcome back air India)
Welcome back, Air India ???????? pic.twitter.com/euIREDIzkV
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 8, 2021
Tata Sons wins the bid for acquiring national carrier Air India pic.twitter.com/XgAW5YBQMj
— ANI (@ANI) October 8, 2021
web titel : Tata Group finally take over Air India Central Government announcement Ratan Tata tweet welcome back air India