thrill of IPL 2021 start today | आजपासून रंगणार आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्याचा थरार : चेन्नई सुपरकिंग्स विरूध्द मुंबई इंडियन्समध्ये सामना, कोण मारणार बाजी उत्सुकता शिगेला !

वाचा IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील बदली खेळाडूंची यादी

 

दिल्ली : वृत्तसंस्था | युएई (UAE) मध्ये आजपासून IPL2021 च्या दुसऱ्या टप्प्याचा थरार रंगणार आहे. कोरोना महामारीमुळे आयपीएलचे सामने भारताबाहेर खेळवले जात आहेत. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरूध्द मुंबई इंडियन्स (MI) या दोन संघात आज पहिला सामना रंगणार आहे.दोन्ही संघात काट्याची टक्कर पहायला मिळणार आहे.(thrill of IPL 2021 start today, csk vs mi match)

टी-२० विश्वचषकासाठी सर्वच संघ जाहीर झाले असले तरी आयपीएलमधील कामगिरी नजरेआड करता येणार नाही. कुणी खेळाडू जखमी झाल्यास त्याची जागा कुणीही घेऊ शकतो.आयसीसीने त्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.

इंडियन प्रीमीयर लीग IPL 2021 चा उर्वरित हंगाम 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे पार पडणार आहे. बीसीसीआयने उर्वरित आयपीएल 2021 चे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे.19 सप्टेंबरला आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात दुबई येथे पार पडणार आहे.thrill of IPL 2021 start today, csk vs mi match dubai)

31 सामन्यांपैकी 13 सामने दुबईत, 10 सामने शारजाहमध्ये आणि 08 सामने अबुधाबीमध्ये पार पडतील. तसेच 07 डबल हेडर (एकाच दिवशी 02 सामने) असतील. डबल हेडरमध्ये पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 03:30 वाजता सुरु होईल. दुसरा सामना संध्याकाळी 07:30 वाजता सुरु होईल.

मुंबईने 07 पैकी 04 तर चेन्नईने 07 पैकी 05 सामने जिंकले आहेत. मागच्या सत्रात दारुण कामगिरी करणाऱ्या चेन्नईला ऋतुराज गायकवाड,इम्रान ताहिर, मोईन अली रवींद्र जडेजा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना हे देखील फॉर्ममध्ये परतण्याची आशा आहे.

मुंबईला फलंदाजीत मधल्या फळीत आणि गोलंदाजीत पॉवर प्लेमध्ये कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि लेगस्पिनर राहुल चहर यांनी विश्वचषकासाठी संघात स्थान मिळविल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासत भर पडली असावी. हार्दिकने नियमित गोलंदाजी केल्यास पर्याय उपलब्ध असतील.

मुंबई इंडियन्स विरूध्द चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात सामना आज सायंकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. यंदा होत असलेल्या आयपीएल स्पर्धेची क्रिकेटप्रेमींना मोठी उत्सुकता लागली आहे.

IPL 2021 च्या दुसर्‍या टप्प्यासाठी बदलण्यात आलेले खेळाडू खालील प्रमाणे 

(पूर्वीचा खेळाडू – बदली खेळाडू (संघ)

एम सिद्धार्थ – कुलवंत खेजरोलिया (दिल्ली कॅपिटल्स)
ख्रिस वोक्स – बेन ड्वारशूइस (दिल्ली कॅपिटल्स)

झाय रिचर्डसन – आदिल राशिद (पंजाब किंग्स)
रिली मेरेडिथ – नॅथन एलिस (पंजाब किंग्स)
डेविड मलान – एडेन मार्करम (पंजाब किंग्स)

जोस बटलर – एविन लुईस (राजस्थान रॉयल्स)
बेन स्टोक्स – ओशान थॉमस (राजस्थान रॉयल्स)
जोफ्रा आर्चर – ग्लेन फिलिप्स (राजस्थान रॉयल्स)
अँड्र्यू टाय – ताब्राईज शम्सी (राजस्थान रॉयल्स)

ऍडम झम्पा – वनिंदू हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
केन रिचर्डसन – जॉर्ज गार्टन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
फिन ऍलेन – टीम डेविड (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
डॅनिएल सॅम्स – दुश्मंता चमिरा (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
वॉशिंग्टन सुंदर – आकाश दीप (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)

मोहिसन खान – रुश कलारिया (मुंबई इंडियन्स)

जॉनी बेअरस्टो – शेर्फेन रुदरफोर्ड (सनरायझर्स हैदराबाद)

पॅट कमिन्स – टीम साऊथी (कोलकाता नाईट रायडर्स)

अत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 29 सामन्यात कोणता संघ किती सामने जिंकला आहे, किती पराभूत झाला आहे आणि गुणतालिकेत कितव्या स्थानावर आहे जाणून घेऊयात

1. दिल्ली कॅपिटल्स – Delhi Capitals

आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत 12 गुणांसह आणि +0.547 नेटरनरेटसह अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी 08 सामन्यांपैकी 06 सामने जिंकले आहेत, तर 02 सामने त्यांना पराभूत व्हावे लागले आहेत. त्यांना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांविरुद्ध पहिल्या टप्प्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

2. चेन्नई सुपर किंग्स – Chennai Super Kings

तीन वेळचा आयपीएल विजेता संघ चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यानंतर गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे 10  गुण असून +1.273 नेटरनरेट आहे. त्यांनी 07 पैकी 05 सामने जिंकले आहेत आणि 02 सामने पराभूत झाले आहेत. त्यांनी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभूत व्हावे लागले आहे.

3. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर Royal Challengers Bangalore

चेन्नई सुपर किंग्सप्रमाणेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेही आयपीएल:2021च्या पहिल्या टप्प्यानंतर 10 गुण आहेत. मात्र,त्यांचा नेटरनरेट चेन्नईपेक्षा कमी असल्याने ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा नेटरनरेट -0.171 आहे. त्यांनी 07 पैकी 05 सामने जिंकले आहेत. त्यांना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.

4. मुंबई इंडियन्स – Mumbai Indians

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आयपीएल 2021च्या पहिल्या टप्प्यानंतर गुणतालिकेत 07 सामन्यांपैकी 04 सामने जिंकून चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे 08 गुण असून +0.062 नेटरनरेट आहे. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या तीन संघाविरुद्ध पराभव स्विकारले आहेत.

5. राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals

आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत 05 व्या क्रमांकावर आहे. त्यांनी 07 पैकी 03 सामने जिंकले आहेत, तर 04 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे 06 गुण आहेत. तसेच त्यांचा नेटरनरेट -0.190 आहे. त्यांनी दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांविरुद्ध विजय मिळवले आहेत.

6. पंजाब किंग्स Punjab Kings

आयपीएल 2021 हंगामात पंजाब किंग्स या नव्या नावासह सामील झालेल्या या संघाने 08 सामने पहिल्या टप्प्यात खेळले. त्यातील 03 सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला. तर, 05 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबचेही 06 गुण असून ते कमी नेटरनरेटमुळे 06 व्या क्रमांकावर आहेत. त्यांचा – 0.368 नेटरनरेट आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध विजय मिळवला आहे.

7. कोलकाता नाईट रायडर्स Kolkata Knight Riders

दोन वेळच्या आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएल 2021 हंगामात पहिल्या टप्प्यात खराब कामगिरी राहिली. त्यांना 07 पैकी केवळ 02 सामने जिंकता आले. त्यामुळे गुणतालिकेत -0.494 नेटरनरेटसह आणि 04 गुणांसह कोलकाता संघ सातव्या क्रमांकावर आहे. त्यांनी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स विरुद्ध विजय मिळवले.

8. सनरायझर्स हैदराबाद Sunrisers Hyderabad

यंदा आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यानंतर सर्वात तळाशी राहिलेला संघ सनरायझर्स हैदराबाद ठरला. त्यांना पहिल्या टप्प्यात साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यांना केवळ पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवता आला. त्यामुळे 07 पैकी 06 सामने पराभूत झाल्यानंतर केवळ 02 गुण आणि -0.623 नेटरनरेटसह हैदराबाद 08 व्या क्रमांकावर राहिले.