अंडर 19 विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघ सापडला मोठ्या संकटात, महत्वाचे 6 फलंदाज बाद, कुलकर्णी, खान, सहारन, धस यांनी केली निराशा !
हायलाईट्स:
● अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप फायनल
● भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया
● ऑस्ट्रेलियाकडून भारताला 254 धावांचे लक्ष्य
● भारताच्या 27 षटकात 6 बाद 95 धावा
India vs Australia – ICC Under-19 Cricket World Cup Final Result : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल मुकाबला होत आहे. ऑस्ट्रेलियाने 253 धावा केल्या. 254 धावांचे लक्ष्य पार करताना भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. फायनल सामन्यात भारतीय संघ मोठ्या संकटात सापडला आहे.
254 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 5 विकेट झटपट गमावल्या आहेत. पहिल्या 27 षटकांत भारताने 6 विकेट गमावल्या आहेत. 26 षटकांत भारताने अवघ्या 95 धावा केल्या आहेत. भारताकडून आर्शिन कुलकर्णी हा अवघ्या 3 धावांवर बाद झाला. मुशीर खान हा चांगला फाॅर्मात आहे असे वाटत असतानाच तो 22 धावांवर बाद झाला. भारतीय कर्णधार उदय आज मोठी धावसंख्या गाठू शकला नाही, तो अवघ्या 8 धावांवर बाद झाला.
सेमीफायनल सामन्यात आपल्या धमाकेदार खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या सचिन धस याने सर्वांचीच निराशा केली. तोही स्वस्तात बाद झाला. सचिन धस याने अवघ्या 9 धावा केल्या. प्रियांशू मोलिया हाही लवकर बाद झाला. त्याने 9 धावा केल्या. तर विकेटकीपर फलंदाज अरावेली अवनीश हा शून्यावर बाद झाला.
27 षटकांत भारताचा निम्मा संघ तंबूत परतल्याने भारतीय संघ मोठ्या संकटात सापडला आहे. सध्या आदर्श सिंग हा मैदानावर आहे. तो 35 धावांवर खेळत आहे. तर त्याच्या साथीला मुरूगन अभिषेक हा 8 धावांवर खेळत आहे. भारताच्या आशा याच जोडीवर अवलंबून आहेत. या जोडीने मैदानावर चमत्कार घडवून आणल्यास भारत सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरताना दिसेल. ही जोडी कसा खेळ करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 प्लेईंग ईलेव्हन | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर
टीम इंडिया अंडर 19 प्लेईंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.