नवी दिल्ली : गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी (दि.8) केली. पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखाही आयोगाने जाहीर केल्या आहेत. (Uttar Pradesh, Goa, Punjab, Manipur, Uttarakhand Assembly election dates announced)
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीकडे देशाचे लक्ष आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे.पहिल्या टप्प्याचे मतदान 10 फ्रेबुवारीला होईल, कोरोनामुळे 15 जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा आणि जाहीर सभांना बंदी असेल. रात्री 8 ते सकाळी 8 या काळात प्रचारबंदी असणार आहे. सोशल मीडियावरुन जास्तीत जास्त प्रचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. घरोघरी प्रचारासाठी केवळ पाचजणांना परवानगी असेल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनामुळे मतदान केंद्रात वाढ करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या धास्तीत कोविडची प्रकरणे वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य सचिव आणि गृह सचिव, तज्ज्ञ आणि राज्यांचे आरोग्य सचिव यांच्यासोबत बैठका घेतल्या. त्यांच्याशी सल्लामसलत करुन सध्यस्थिती लक्षात घेतल्यानंतर, सुरक्षिततेच्या निकषांसह निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी नमूद केले. (Uttar Pradesh, Goa, Punjab, Manipur, Uttarakhand Assembly election dates announced)
मतदानाच्या वेळेत एका तासाने वाढ
कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता निवडणूक वेळापत्रकांच्या घोषणेपासून लगेच लागू होते. आचारसंहिता मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने विस्तृत व्यवस्था केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणीही उल्लंघन केल्यास कठोरपणे कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Uttar Pradesh, Goa, Punjab, Manipur, Uttarakhand Assembly election dates announced)
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच संबंधित राज्यांतील कोविड तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेतला. सदर राज्यातील प्रशासनांनी लसीकरण मोहिमेला वेग द्यावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आल्याचे समजते.
बिगुल वाजला !
उत्तर प्रदेशात 7 टप्पे, मणिपूर 2 तर पंजाब, गोवा, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून 10 मार्चला पाच राज्यांची मतमोजणी होणार आहे.
उत्तर प्रदेश निवडणूक Uttar Pradesh Assembly election 2022 : 7 टप्पे
मतदान – 10 फेब्रुवारी ते 7 मार्च
गोवा निवडणूक Goa Assembly election 2022 : 1 टप्पा
मतदान – 14 फेब्रुवारी
पंजाब निवडणूक Punjab Assembly election 2022 : 1 टप्पा
मतदान – 14 फेब्रुवारी
उत्तराखंड निवडणूक Uttarakhand Assembly election 2022 : 1 टप्पा
मतदान – 14 फेब्रुवारी
मणिपूर निवडणूक Manipur Assembly Election 2022 : 2 टप्पे
मतदान – 27 फेब्रुवारी, 3 मार्च
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 10 मार्चला