What is the short biography of all 15 players in t20 World Cup in 2021? | 2021 मध्ये t20 विश्वचषकातील सर्व 15 खेळाडूंचे संक्षिप्त चरित्र काय आहे? चला तर मग जाणून घेवूयात
What is the short biography of all 15 players in t20 World Cup in 2021? | T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2021 चा थरार 24 ऑक्टोबर पासुन रंगणार आहे. या स्पर्धेत दिग्गज संघासोबत भारतीय संघाची टक्कर होईल. T20 विश्वचषक स्पर्धेचा विजेता बनण्यासाठी सर्वच संघ जीव ओतून मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
भारतीय संघ यंदाच्या T20 विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. सराव सामन्यात भारतीय संघाने याची झलक दाखवून दिली आहे. भारतीय संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता असलेले खेळाडू भारतीय संघात आहेत. धडाकेबाज फलंदाजीबरोबरच गोलंदाजी विभागातही विरोधी संघाच्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणारे अस्त्राचा संघात समावेश आहे. वेगवान व फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश आहे.
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात 2021 मध्ये t20 विश्वचषकातील सर्व 15 खेळाडूंचे संक्षिप्त चरित्र काय आहे? जाणून घेऊयात what is the short biography of all 15 players in t20 world cup in 2021?
1) विराट कोहली – कर्णधार
कर्णधार – विरोट कोहली – विराट कोहली हा मधल्या फळीतील आक्रमक व सर्वोत्तम फलंदाज म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये ओळखला जातो. चपळ क्षेत्ररक्षण ही कोहलीची जमेची बाजु. अधुन मधून तो वेळप्रसंगी गोलंदाजीही करतो. कर्णधार म्हणुन कोहली हा मैदानावर अतिशय आक्रमक असतो. संघात विजयी स्पिरीट निर्माण करण्यासाठी त्याचे सदैव प्रयत्न असतात. 34 वर्षीय विराट कोहलीने अत्तापर्यंत 90 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3154 धावा पटकावल्या आहेत. नाबाद 94 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याची सरासरी 52.65 इतकी आहे. अत्तापर्यंत त्याने 28 अर्धशतके खेळले आहेत. कोहली यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे भारतीयांचे लक्ष असणार आहे.
2) रोहित शर्मा (उपकर्णधार)
रोहित शर्मा ( उपकर्णधार) : भारतीय संघातील सर्वात धडाकेबाज उत्कृष्ट फलंदाज म्हणून रोहित शर्माची जागतिक क्रिकेटमध्ये ओळख आहे. रोहितची बॅटिंग पाहणे म्हणजे एक स्पेशल नजराणाच असतो. पुल शाॅटसाठी तो खास ओळखला जातो. सलामीवीर म्हणून तो भारतीय संघात खेळत आहे. रोहितचा जन्म नागपूरचा आहे. तो IPL व रणजी स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व करतो. उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रोहितने अत्तापर्यंत 111 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2864 धावा वसुल केल्या आहेत. 118 ही त्याची T20 मधील सर्वोच्च धावसंख्या आहे. रोहितने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 04 शतकांसह 22 अर्धशतके झळकावली आहेत. यंदा रोहितच्या आक्रमक फलंदाजीतून विश्वचषक जिंकण्याचा पाया रचला जाईल.
3) के एल राहूल ( सलामीवीर)
के एल राहूल ( सलामीवीर) भारताचा आणखी एक आक्रमक सलामीवीर म्हणून 29 वर्षीय के एल राहुलची जागतिक क्रिकेटमध्ये ओळख आहे. सलामीवीर म्हणून के एल राहुल हा अव्वल फळीचा दमदार फलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये राहूल कर्नाटकचे नेतृत्व करतो. राहूलने अत्तापर्यंत 49 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1557 धावा वसुल केल्या आहेत. यामध्ये 110 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याच्या नावावर दोन शतके व 12 अर्धशतके आहेत.
4) रविंद्र जडेजा (अष्टपैलू खेळाडू)
रविंद्र जडेजा : सौराष्ट्राने भारतीय संघाला दिलेला अद्भूत खेळाडू म्हणून रविंद्र जडेजाची जागतिक क्रिकेटमध्ये ओळख आहे. 32 वर्षीय जडेजा हा डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो व डाव्या हाताने फलंदाजी. आक्रमक फलंदाजी हे त्याचे बलस्थान आहे. याच बळावर तो कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता ठेवतो. अनेकदा त्याने अडचणीतून संघाला बाहेर काढत विजय मिळवून दिला आहे. तो अत्तापर्यंत 50 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात त्याने 218 धावा व 39 बळी घेतले आहेत. जडेजा हा गेम फिनीशर म्हणून ओळखला जातो. मैदानावर तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणूनही सर्वांचे लक्ष वेधून घेतो. अष्टपैलु जडेजा संघाच्या विजयातील महत्वाचा स्तंभ म्हणून नेहमी भूमिका बजावत असतो. त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. रविंद्र जडेजा हा IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज चा स्टार खेळाडू आहे.
5) ऋषभ पंत ( यष्टीरक्षक- फलंदाज )
ऋषभ पंत : भारतीय क्रिकेटचा तरणाबांड गेमचेंजर. अवघं 23 वर्षाचा असलेला ऋषभ पंत हा आक्रमक डावखुरा फलंदाज आहे. त्याचा जन्म हरिद्वारचा आहे. यष्टीरक्षक- फलंदाज म्हणून तो भारतीय संघात यंदा खेळताना दिसणार आहे. दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या पंतने अत्तापर्यंत 33 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 512 धावा केल्या आहेत. यात 65 धावांची सर्वोच्च खेळी त्याने केली आहे. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. पंत हा गेमचेंजर खेळाडू आहे. त्याची आक्रमक फलंदाजी कसलेल्या गोलंदाजांच्या मनात धडकी भरवत असते.
6) इशान किशन ( यष्टीरक्षक – फलंदाज )
इशान किशन : भारतीय क्रिकेटचा आणखीन एक गेम चेंजर तरणाबांड खेळाडू. 23 वर्षीय इशान किशन झारखंड सारख्या मागासलेल्या राज्यातून येतो. गुणवत्तेच्या बळावर त्याने संघात स्थान पटकावले आहे. तो भारतीय संघात यष्टीरक्षक- फलंदाज म्हणून सहभागी झाला आहे. सन 2016 साली बांग्लादेशमध्ये पार पडलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत इशानने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याने इंग्लंडविरुद्ध च्या सामन्यातून T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले आहे. देशांतर्गत स्पर्धा व IPL मध्ये त्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. इशान अत्तापर्यंत 03 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळला आहे. यात त्याने 80 धावा केल्या आहेत. यात 56 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
7) सुर्यकुमार यादव (आक्रमक फलंदाज)
सुर्यकुमार यादव : हा उजव्या हाताचा अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. मुंबई संघाकडून तो खेळतो. अव्वल फळीतील आक्रमक फलंदाज म्हणून सूर्यकुमार ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये त्याने यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले. यादवने खेळलेल्या 03 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 124 धावा केल्या आहेत. तर चार T20 सामन्यात 139 धावा केल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत यादवच्या स्फोटक फलंदाजीकडे सर्वांचेच लक्ष असेल.
8) भुवनेश्वर कुमार ( वेगवान गोलंदाज )
भुवनेश्वर कुमार : भारतीय गोलंदाजी विभागातील सर्वात घातक शस्त्र म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये ओळखले जाते. स्विंग गोलंदाजी व घातक याॅर्कर हे भूवीच्या गोलंदाजीचे बलस्थान आहे. 31 वर्षीय भूवी हा भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज आहे. विरोधी संघाला रोखण्याची मुख्य मदार भूवीवर असेल. त्याने अत्तापर्यंत 51 T20 सामन्यात 50 बळी घेतले आहे. यात 24 धावांत 05 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी राहिलेली आहे.
09) जसप्रित बुमराह ( वेगवान गोलंदाज)
जसप्रित बुमराह (वेगवान गोलंदाज) : भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागातील सर्वात घातक अस्त्र म्हणून ओळखला जातो. शेवटच्या षटकांतील (डेथ ओवर) खतरनाक गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. बुमराहचे याॅर्कर भल्या भल्या दिग्गज फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवतात. 27 वर्षीय बुमराहने अत्तापर्यंत 50 टी 20 सामन्यात एकुण 59 बळी घेतले आहेत. त्याची 11 धावांत तीन बळी ही सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे. मोक्याच्या क्षणी संघाला विकेट्स मिळवून देणारा गोलंदाज अशी बुमराहची ओळख आहे. भारताच्या अनेक विजयात बुमराहच्या घातक गोलंदाजीने सिंहाचा वाटा उचललेला आहे.
10) आर अश्विन (फिरकीपटू)
आर अश्विन ( फिरकी गोलंदाज) तामिळनाडूचा रहिवासी असलेला आर अश्विन हा भारतीय फिरकी विभागाचा सर्वात प्रभावी हुकमी एक्का आहे. अश्विन हा अतिशय धूर्त गोलंदाज म्हणून जागतिक पातळीवर ओळखला जातो. 34 वर्षीय आर अश्विन गोलंदाजी आला की विरोधी संघातील फलंदाजाला धडकी भरते. अश्विनच्या भात्यातील गुगली व कॅरम बाॅल हे दोन प्रभावी अस्त्र आहेत.अश्विन हा भारतीय फिरकी विभागाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तब्बल चार वर्षात नंतर त्याचे भारतीय संघात पुन्हा आगमन झाले आहे. तो अत्तापर्यंत 46 सामने खेळला आहे. यात त्याने 08 धावांत 04 बळी ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवलेली आहे. आश्विन हा वेळप्रसंगी फलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करतो.अनेकदा त्याने फलंदाजीत चमकदार कामगिरी करून संघाला तारले आहे.
11) अक्षर पटेल (फिरकी गोलंदाज)
अक्षर पटेल (फिरकी गोलंदाज) : हा भारतीय संघाचा युवा फिरकी गोलंदाज आहे. त्याने 2015 मध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्धच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले. 27 वर्षीय अक्षर पटेल हा स्लो लेप्ट आर्म ऑर्थोडाॅक्स गोलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय T20 चे बारा सामने खेळून 09 विकेट मिळवल्या आहेत. तो डाव्या हाताने उत्कृष्ट फलंदाजी करू शकतो. अक्षर पटेल हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधीत्व करतो.
12) मोहम्मद शमी (वेगवान गोलंदाज)
मोहम्मद शमी ( वेगवान गोलंदाज) : हा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. घातक याॅर्कर हे शमीचे मुख्य अस्त्र आहे.सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये शमी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात शमीची जबरदस्त कामगिरी आहे.T20 सामन्यात शमीला कमी संधी मिळाली आहेत.अवघे 12 सामने शमी खेळला आहे. यात त्याने 12 बळी घेतले आहेत. यात 38 धावा देत 03 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. विश्वचषकात शमी भारतीय संघाच्या गोलंदाजीचा मुख्य अस्त्र असेल.
13) वरूण चक्रवर्ती (ऑफस्पिनर)
वरूण चक्रवर्ती : हा ऑफस्पिनर गोलंदाज आहे. हा तामिळनाडू संघाकडून खेळतो. 30 वर्षीय वरूणने या वर्षीच्या प्रारंभी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या T20 सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले आहे. अत्तापर्यंत तो 03 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात त्याने दोन विकेट्स घेतल्या आहे. वरुणच्या गोलंदाजी यंदाच्या विश्वचषकात चमत्कार घडवणारी ठरू शकते. हा खेळाडू विरोध संघासाठी सरप्राईज पॅकेज असेल. त्याच्या कामगिरीचे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
14) राहुल चहर (लेगस्पिनर)
राहुल चहर हा राजस्थानचा खेळाडू आहे. लेगस्पिन गोलंदाजी हे राहूलचे अस्त्र आहे. त्याची गोलंदाजी खेळणे फलंदाजाला अव्हानात्मक असणार आहे. 2019 मध्ये राहूलने वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो अत्तापर्यंत 05 सामने खेळला आहे. यात त्याने सात विकेट्स घेतल्या आहेत. 15 धावांत 03 बळी ही राहुलची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
15) हार्दिक पंड्या (अष्टपैलू खेळाडू)
हार्दिक पंड्या : हा भारतीय संघातील महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. वेगवान गोलंदाजी , आक्रमक फलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षण हे त्याचे बलस्थान आहे. 27 वर्षीय हार्दिक बडोदा संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो अत्तापर्यंत 49 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळला आहे. यात त्याने 484 धावा केल्या आहेत. 42 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच त्याने 42 विकेट्स घेतल्या आहेत. यात 38 धावांत 04 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.