zyber 365 Pearl Kapur Net Worth : भारतातील सर्वात तरूण उद्योगपती बनला 9 हजार 800 कोटींचा मालक ! कोण आहे पर्ल कपूर ? जाणून घ्या सविस्तर !
zyber 365 Pearl Kapur Net Worth News in Marathi : गर्भ श्रीमंत व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं, पण ते स्वप्न मोजक्याच लोकांच्या नशिबी येतं. सध्या तरूणांमध्ये झटपट श्रीमंत होण्याची क्रेझ वाढली आहे. तरूणांमध्ये नवनवे उद्योग निर्माण करण्याची क्रेझ आहे. नाविन्यपूर्ण कल्पना राबवून उद्योग उभारले जात आहेत. देशात सध्या एका तरूण उद्योगपतीची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याला कारण ठरलीय त्याने 3 महिन्यात कमवलेली करोडोंची संपत्ती !
भारतासह जगभरात चर्चेत आलेल्या त्या तरूण उद्योजकाचं नाव आहे पर्ल कपूर, पर्ल कपूर (Pearl Kapur) या तरूण उद्योगपतीचं वय अवघं 27 वर्षांचं आहे. (Pearl Kapur age 27 year old) पर्ल कपुरने अवघ्या तीन महिन्यात $1.1 बिलियन (9.128 कोटी ) रूपये आपल्या कंपनीच्या माध्यमांतून कमावले आहेत. भारतातील सर्वात तरूण अब्जाधीश म्हणून त्याची आता ओळख निर्माण झाली आहे. जाणून घेऊयात त्याचीच ही गोष्ट ! (Pearl Kapur Net Worth)
Zylber 365 कंपनी स्थापनेच्या पुर्वी पर्ल कपूर हे antier solution या कंपनीसाठी आर्थिक व व्यवसाय सल्लागार म्हणून काम पाहत होते. Zylber 365 या कंपनीच्या स्थापनेपूर्वी पर्ल कपूर यांनी बिलियन पे टेक्नाॅलाॅजीज ही कंपनी फेब्रुवारी 2022 मध्ये स्थापन केली होती. त्यानंतर पर्ल कपूर या तरूण उद्योजकाने 2023 साली zyber 365 ही कंपनी स्थापन केली.
Pearl Kapur Net Worth : पर्ल कपूर नेट वर्थ
Web3 या क्षेत्रात ते सध्या काम करत आहेत. अल्पावधीतच त्यांनी या क्षेत्रात जम बसवलाय. AI ची वाढत्या क्रेझने त्यांना या उद्योगात आणले. Zylber 365 या कंपनीचे 90% शेअर्स पर्ल कपूर (Pearl Kapur) याच्याकडे आहेत. सध्या कंपनीची संपत्ती 9 हजार 128 कोटी इतकी झाली आहे. कंपनीने प्रतिष्ठित युनिकाॅर्न दर्जा मिळवला आहे. अवघ्या एका वर्षात पर्ल कपूरने Zylber 365 च्या माध्यमांतुन मारलेली भरारी देशभर चर्चेचा विषय ठरली आहे.
कोण आहे पर्ल कपूर? (Who is Pearl Kapur?)
पर्ल कपूर Pearl Kapur हा भारतातील तरूण उद्योजक आहे. त्याचे शिक्षण लंडनमधील क्वीन मेरी विद्यापीठात झाले. त्याने इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये पदवी (Pearl Kapur qualification) प्राप्त केली आहे. पर्ल कपूर हा 27 वर्षीय तरूण Zylber 365 या कंपनीचा संस्थापक आहे. 2023 साली त्याने ही कंपनी स्थापन केली. कंपनी स्थापनेच्या पुर्वी पर्ल कपूर हे antier solution या कंपनीसाठी आर्थिक व व्यवसाय सल्लागार म्हणून काम पाहत होते. Zylber 365 या कंपनीच्या स्थापनेपूर्वी पर्ल कपूर यांनी बिलियन पे टेक्नाॅलाॅजीज ही कंपनी फेब्रुवारी 2022 मध्ये स्थापन केली होती. Zylber 365 ही स्टार्टअप कंपनी वेब आणि AI आधारीत OS स्टार्टअप आहे. या कंपनीचे मुख्यालय युनायटेड किंगडममध्ये आहे, मात्र या कंपनीचा व्यवसाय भारतातील अहमदाबाद येथून केला जातो. (Pearl Kapur Net Worth)
कोण आहे भारतातील सर्वात तरूण अब्जाधीश?
zyber 365 या कंपनीची स्थापना केल्यानंतर पर्ल कपूर (Pearl Kapur) यांनी वेब आणि AI आधारीत OS मध्ये काम सुरू केले. Web3 च्या क्षेत्रात त्यांनी अवघ्या 3 महिन्यात कंपनीला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. सध्या या कंपनीचे मूल्यांकन 1.2 बिलियन (9 हजार 840) इतके आहे. भारत आणि आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी म्हणून zyber 365 ला पाहिले जात आहे. या कंपनीला युनिकाॅर्न दर्जा आहे. पर्ल कपूर यांची zyber 365 कंपनीत 90% हिस्सेदारी असल्यामुळे त्यांची एकुण संपत्ती 9 हजार 129 कोटी इतकी आहे. (Pearl Kapur Net Worth)