zydus cadila covid vaccine ZyCov-D Approval | स्वदेशी बनावटीच्या आणखी 01 करोना लसीला देशात मान्यता !
भारताने तयार केली DNA Plasmid लस
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : zydus cadila covid vaccine ZyCov-D Approval | भारतात कोरोनाची तिसरी लाट सक्रीय होऊ नये यासाठी केंद्र सरकारने लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. आता भारतीय नागरिकांसाठी (ZyCov-D) आणखी एक नवी लस उपलब्ध झाली आहे. ही लस भारतीय बनावटीची आहे. देशात लसीच्या वापरास केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. (The third indigenous corona vaccine has been approved.)
सरकारी तज्ञ्जांच्या समितीने झायडस कॅडिलाच्या (cadila healthcare) तीन डोस असलेल्या ‘जॉयकोव्ह-डी’ लसीला परवानगी देण्याची शिफारस केली होती.त्यानंतर लसीला मंजुरी देण्यात आली आहे.केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाच्या समितीने (central drugs standard control organisation) जॉयकोव्ह-डीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.(zydus cadila covid vaccine ZyCov-D Approval )
५० पेक्षा जास्त केंद्रांवर या लसीची चाचणी घेण्यात आली होती. भारतीय कंपनीने तयार केलेली जगातील पहिली डीएनए लस आहे, असा दावा जॉयडसने केला आहे. जॉयकोव्ह-डी ही जगातील पहिली डीएनए आधारीत लस आहे. तसेच या लसीचे तीन डोस देणं आवश्यक आहे.
अहमदाबादमधील फार्मास्युटिकल कंपनी असेल्या झायडस कॅडिलाने (cadila healthcare) १ जुलै रोजी जॉयकोव्ह-डी (covid vaccine zycov) लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मंजुरी मागितली होती. (zydus cadila covid vaccine ZyCov-D Approval ) ही लस म्हणजे ZyCov-D. जी भारताने तयार केलेली जगातील पहिली DNA Plasmid कोरोना लस आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील झायडस कॅडिला (Zydus cadila) कंपनीने ही तीन डोसवाली लस तयार केली. (Zydus Cadila had on July 1 sought approval from the Indian Comptroller General of Drugs for emergency use of the ZyCov-D vaccine. The world’s first three-dose coronal DNA plasmid made by India has been developed by Zydus Cadila in Ahmedabad, Gujarat.)
केंद्र सरकारचं डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी (Department of Biotechnology) आणि इंडियन काऊन्सिलल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Council of Medical Research) यांच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (Drug Controller General of India) तज्ज्ञ समितीने या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. समितीने या लशीच्या दोन डोसांच्या प्रभावाबाबत अतिरिक्त डेटाही मागितला आहे. (zydus cadila covid vaccine ZyCov-D Approval)
कॅडिला हेल्थकेयर लिमिटेड कंपनीने (Cadila Healthcare Limited Company) या लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळावी यासाठी एक जुलैला अर्ज केला होता. यावेळी 28 हजार जणांवर करण्यात आलेल्या शेवटच्या ट्रायलच्या डेटानुसार हे आवेदन करण्यात आलं होतं. या लशीचा प्रभाव ६६.६ टक्के असल्याचं या ट्रायलमध्ये दिसून आलं. शिवाय ही लस १२ ते १८ वयोगटातील लहान मुलांसाठीही सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं.
भारताने तयार लसीला मंजुरी मिळाल्याने ही भारतात वापरली जाणारी सहावी लस आहे.आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे. (Serum Institute – Covishield,bharat Biotech – Kovacin,USA Moderna, Johnson Johnson’s single-dose vaccine is allowed.)
Zydus Cadila receives approval for Emergency Use Authorization from DCGI for ZyCoV-D today. World’s first & India’s indigenously developed DNA based vaccine for #COVID-19 to be administered in humans including children & adults 12 yrs and above: Ministry of Science & Technology pic.twitter.com/VfL39B8xTJ
— ANI (@ANI) August 20, 2021
After evaluation of interim Phase III clinical trial results in consultation with Subject Expert Committee, CDSCO has approved DNA COVID-19 vaccine (ZyCoV-D) of M/s Cadila Healthcare for restricted use in emergency situation in India for 12 years and above.
— CDSCO_INDIA_INFO (@CDSCO_INDIA_INF) August 20, 2021
Zydus receives EUA from DCGI for ZyCoV-D, the only needle-free COVID vaccine in the world. #Zydus #vaccine #zycovd #atmanirbharbharat #worldsfirstdnavaccine #dnavaccine #covid pic.twitter.com/UmYUpPymx0
— Zydus Cadila (@ZydusUniverse) August 20, 2021