Ram Shinde News : चुली वाटून आमची बारामती करणार आहात का ? आमदार प्रा. राम शिंदेंचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । “तुम्ही आम्हाला त्या इंग्रजासारखं किती दिवस गंडवणार आहात ? गरिब माणसं गरिब राहिले पाहिजेत, त्याच्याशिवाय ते माग राहत नाहीत ; अशी ज्याची संकल्पना आहे, त्याला आता काम दाखवायची वेळ आली आहे, असे म्हणत आता तर त्यांनी चुली वाटपाचा कार्यक्रम आणलाय, सरकार म्हणतयं गॅस वापरा, पण ते चुली वाटत सुटलेत, तुम्ही म्हणले होते ना तुमची बारामती करू? आमची प्रगती करायची सोडून, तुम्ही तर चुली वाटायला लागलात, चुली वाटून आमची बारामती करणार आहात का ? असा सवाल करत आमदार प्रा.राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला.”

Are you going to do our Baramati by sharing the stove? MLA Ram Shinde strongly attacked Rohit Pawar, ram shinde rohit pawar jamkhed news today,

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा पहिला व दुसरा हप्ता जमा झाल्याबद्दल जामखेड तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या वतीने आमदार प्रा. राम शिंदे यांचा नान्नज येथे आज १४ रोजी भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी पार पडलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात हजारो लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या रामभाऊला राखी बांधत ‘भावा तु लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत’ असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार प्रा.राम शिंदे हे बोलत होते.

“यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, ते म्हणतात आम्ही संघर्ष करतो, श्रीमंतांच्या घरी जन्माला आल्यावर संघर्ष असतो का? जो माणूस सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला त्याच्या वाट्याला संघर्ष कसा येईल ? दहा हजार कोटीचा मालक संघर्षात असतो का? ते कधी रोजगार हमीवर  गेलेत का? त्यांनी कधी ज्वारी उपटली का? त्यांनी कधी करडीचा पाटा उपटलाय का? असा सवाल करत तुमच्या या लाडक्या रामभाऊच्या बापाने ३५ वर्षे सालं घातलेत, सालगड्याचा पोरगा सरपंच, दोनदा आमदार, मंत्री, पालकमंत्री, पडला तरी परत आमदार झाला याला म्हणायचं संघर्ष असे म्हणत आमदार शिंदे रोहित पवारांच्या संघर्ष करतोय या वक्तव्याचा समाचार घेतला.”

Are you going to do our Baramati by sharing the stove? MLA Ram Shinde strongly attacked Rohit Pawar, ram shinde rohit pawar jamkhed news today,

“मागच्या निवडणुकीत बारामती ॲग्रोला अनेक गाड्या भरून जायच्या, आता, मागच्या चार वर्षांत कोणालाच तिकडं नेलं नाही, न्यायचं म्हटलं तर पैसे भरा म्हणायचे, पण आता निवडणूक जवळ आली की पुन्हा मतदारसंघात गाड्या फिरायला लागल्या, पाच वर्षे तुम्ही आमच्या लोकांचा सन्मान करायचा सोडून अवमान केला, खवडा केला. गावागावात जाऊन आमच्या भागातल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, लोकांची झाडाझडती घेतली. पण आता सहानुभूती मिळवण्यासाठी गावभर फिरून झाडलोट सुरयं, आता आमची स्वाभिमानी माणसं तुम्हाला माफ करणार नाहीत, असा इशारा यावेळी शिंदे यांनी दिला”

Are you going to do our Baramati by sharing the stove? MLA Ram Shinde strongly attacked Rohit Pawar, ram shinde rohit pawar jamkhed news today,

“यावेळी आमदार शिंदे यांनी आमदार व मंत्री असताना केलेल्या विकास कामांची जंत्रीच वाचून दाखवली. लाडक्या बहिणींना सध्या मिळणारा दीड हजाराचा पगार तीन हजार करायचा असेल तर राज्यात पुन्हा आपलं लाडकं सरकार आणि आपला लाडका रामभाऊ आमदार करायची जबाबदारी तुमची आहे. सगळी गरिबी मला माहित आहे. गरिबीची जाणिव असलेला तुमचा हा रामभाऊ आहे.कधीच, केव्हाही, अडचणीच्या काळात, दु:खाच्या काळात,  सुखात तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहणारा हा तुमचा लाडका रामभाऊ कधीही तुमची पात्ररणा करणार नाही, मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्या लाडक्या रामभाऊला साथ द्या, अशी भावनिक साद यावेळी शिंदे यांनी लाडक्या बहिणींना घातली.”

Are you going to do our Baramati by sharing the stove? MLA Ram Shinde strongly attacked Rohit Pawar, ram shinde rohit pawar jamkhed news today,

लाडकी बहिणी योजनेला विरोधकांनी विरोध केला, कोर्टात गेले. कोर्टाने सरकारच्या बाजूने निकाल दिला. सभागृहात लाडकी बहिणी योजनेला विरोध करायचा अन् मतदारसंघात आलं की योजनेच्या फाॅर्मवर स्वता:चा फोटो छापून वाटत सुटले, आमचा फाॅर्म भरा, आमचा फाॅर्म भरा असे लोकांना सांगत सुटले. पण तोही त्यांचा डाव फसला. त्यांची गंडवागंडवी फसवा फसवी आता जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे स्वाभिमानी जनता त्यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे, असे म्हणत शिंदे यांनी रोहित पवारांचे वाभाडे काढले.

Are you going to do our Baramati by sharing the stove? MLA Ram Shinde strongly attacked Rohit Pawar, ram shinde rohit pawar jamkhed news today,

यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, जिल्हा बँकेच्या माजी संचालक वंदना पवार, तालुकाध्यक्ष संजीवनी पाटील, माजी सभापती मनिषा सुरवसे, उषाताई मुरूमकर, अर्चना राळेभात, दिपाली गर्जे, मनिषा मोहळकर, सरपंच प्रभावती मोहळकर, मंजुश्री जोकारे, उपसरपंच शालन साठे, सुरेखा कोळपकर, सुनिता कोळपकर, अनिता मोहळकर, मनिषा हजारे, सविता हजारे, अनिता कुलकर्णी, सुवर्णा मलंगनेर, कोमल पवार, अलका जगदाळे, पुजा सुतार, अफसरबी शेख, दर्शना साळवे, सरस्वती बोराटे, शुभांगी वाघमारे, दिपाली बांदल, स्नेहल शिरसाठ, सुनिता लोंढे, प्रतिभा हजारे, सह हजारो लाडक्या बहिणी व भाजपा व महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.