बीडच्या राजकारणात भूकंप : भाजपाचे नेते देऊ लागले धडाधड राजीनामे (Earthquake in Beed politics: BJP leaders start resigning)
खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने उसळली संतापाची लाट
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बीडच्या खासदार डाॅ प्रीतम मुंडे (MP Dr Pritam Munde beed) यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्याने मुंडे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पक्षाने डाॅ प्रीतम मुंडे यांच्केयावर केलेल्या अन्यायामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थेचा बांध आता फुटला आहे. बीडच्या राजकारणात भूकंपाचे झटके बसु लागले आहेत.(Earthquake in Beed politics: BJP leaders start resigning)
बीड जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी (bjp workers) धडाधड राजीनामे देण्याचे सत्र हाती घेतले आहे. एकाच दिवसात तब्बल २५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुकाध्यक्षांचा समावेश आहे.(Earthquake in Beed politics: BJP leaders start resigning)
खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद डावलल्यामुळे भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नाराज भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. एकाच दिवशी बीड जिल्ह्यातील ११ तालुकाध्यक्षांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले आहेत.(Earthquake in Beed politics: BJP leaders start resigning)
त्याआधी शुक्रवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शनिवारी शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.(Earthquake in Beed politics: BJP leaders start resigning)
दरम्यान, प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसात अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने आता आणखीन किती राजीनामे येणार ? यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार ? याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे.(Earthquake in Beed politics: BJP leaders start resigning)
बीड जिल्ह्यातील खालील पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
१) ऍड सुधीर घुमरे पाटोदा – तालुकाध्यक्ष
२) अरुण राऊत – तालुकाध्यक्ष माजलगाव
३) भगवान केदार – तालुकाध्यक्ष केज
४) सतीश मुंडे – परळी
५) बाळासाहेब तोंडे – धारूर
६) पोपट शेंडगे – वडवणी
७)अच्युतराव गंनगे – अंबेजोगाई
८) डॉ मदुसूदन खेडकर – शिरुर
९) डॉ वासुदेव नेहरकर-वैद्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष
१०) डॉ लक्ष्मण जाधव – भटके-विमुक्त आघाडी
११) धनंजय घोळवे- दिव्यांग आघाडी
१२) संग्राम बांगर- विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष
१३) बबन सोळंके -जिल्हा सचिव भाजप
१४) प्रदीप नागरगोजे-विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष
Earthquake in Beed politics: BJP leaders start resigning