Ashok Chavhan : अखेर अशोक चव्हाण मीडियासमोर आले, काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यावर काय म्हणाले ? वाचा सविस्तर
Ashok Chavan resignation latest news : काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. कालपर्यंत काँग्रेस पक्षाच्या बैठकांमध्ये सक्रीय असलेल्या अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सकाळपासून नाईट रिचेबल होते. दुपारनंतर चव्हाण हे माध्यमांसमोर आले. त्या आधी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत आपल्या राजीनाम्याची माहिती सार्वजनिक केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण नेमकं काय म्हणालेत? पाहूयात.
मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे, पक्षाच्या वर्किंग कमीटीचाही राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले आहे. मला कोणाबद्दल तक्रार करायची नाही. मला कोणाबद्दल व्यक्तीगत काही बोलायचे नाही. या पुढची राजकीय दिशा मी दोन दिवसात निर्णय घेऊन ठरवेन. पुढे काय हे अजुनही ठरवलेले नाही, अशी प्रतिक्रीया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
“भाजपची कार्यप्रणाली मला अद्यापही माहिती नाही, भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी अजुनही घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीला काही कारण असलेच पाहिजे असं नाही. माझ्या जन्मापासून मी काँग्रेसचे काम केले आहे, मला वाटलं आता अन्य पर्याय पाहिले म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले. मला कोणत्याही पक्षांतराची जाहीर वाच्छता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुनी काढायची नाही, मला वाटलं आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, असंही अशोक चव्हाण म्हणाले
मी कालपर्यंत काँग्रेस पक्षाच्या मिटींगमध्ये होतो, कालपर्यंत मी पक्षासोबत होतो. आज मी पक्षाचा राजीनामा दिला आहे, पुढची दिशा मी दोन दिवसात ठरवणार आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.