मोठी बातमी : अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले आता जेष्ठ नेते एकनाथ खडसेंचंही ठरलं, पण काय ? जाणून घ्या !
Eknath khadse current news। 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण राजकीय भूकंपाने व्यापून गेले आहे.युती तुटली.महाविकास आघाडी झाली. शिवसेना फुटली.भाजप सत्तेवर आली.राष्ट्रवादी फुटली.महायुती सत्तेवर आली.अश्या एक ना अनेक राजकीय घटना राज्यात घडत आहेत. आता काँग्रेस पक्षालाही गळती लागली आहे. येत्या काही दिवसांत आणखीन मोठे भूकंप होणार असा दावा केला जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला टाटा बाय करत आज भाजपचे कमळ हाती घेतले. आता शरद पवारांच्या गटातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचही ठरलं असल्याची चर्चा आहे.
राज्याच्या राजकारणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. अशोक चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर आता शरद पवारांना आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला कारण ठरलयं, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य, भाजप नेते गिरीश महाजन यांनी जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बाबत मोठा दावा केला आहे. खडसे हे भाजपात येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
गिरीश महाजन यांनी नेमकं काय म्हटलंय?
“भाजपमध्ये येण्यासाठी खडसे यांचे खूप निरोप येत आहेत. भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसे यांचे फार जोर लावून प्रयत्न चालले आहेत. असं मला कळतंय. त्याबाबत मला दिल्ली आणि राज्याकडूनही कळतंय. मात्र, मला याबाबत काहीच विचारणा झालेली नाही. तसे प्रयोजनही दिसत नाही. खडसे यांना घ्यायचं की नाही याबाबत मला विचारण्यात आलेलं नाही. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. पण वर जर त्यांची काही लाईन असेल… हॉट लाईन असेल तर ती त्यांनी लावावी. वरून सिग्नल मिळाला तर चांगलंच आहे, असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलं. त्यामुळे खडसे हे शरद पवार यांना सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपा नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांनी जोर धरलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे वक्तव्य काल केले होते. यामुळे राज्यातील कोणते कोणते नेते भाजपात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपात जाणार का ? यावर आता मोठा खुलासा समोर आला आहे.
एकनाथ खडसेंचं नेमकं काय ठरलं ?
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर मोठा खुलासा केला आहे. खडसे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहिली आहे, त्यात म्हटले आहे की, गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे. असे म्हटले आहे. एकुणच खडसे हे शरद पवारांची साथ सोडणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Edited By – Sattar Shaikh