Maharashtra Politics Latest News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे.अनेक मोठे नेते पक्षांतर करताना दिसत आहे.उमेदवारी याद्या अंतिम करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत आता उद्धव ठाकरे गटासह काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटातील एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचबरोबर काँग्रेसची एक महिला नेत्या भाजपच्या वाटेवर आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू गटातील मोठा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. परंतू तो नेता कोण ? याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. ठाकरे गटातून भाजपात प्रवेश करणाऱ्या त्या नेत्याचे नाव अजून समोर आलेले नाही. मात्र ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, ठाकरे गटाचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हा बडा नेता कोण? या नेत्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र आज ठाकरे गटाचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉईंटच्या पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. हा नेता नेमका कोण, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. परंतू ठाकरे गटातील बडा नेता भाजपात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा आहे.
लोकसभा निवडणूक होत आहे. भाजप, शिवसेना- शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरूद्ध काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात यंदा राज्यात थेट लढत होत आहे. लोकसभेची एक-एक जागा महत्वाची आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. अशात जर बडा नेता ठाकरेंना सोडून भाजपमध्ये गेला तर ठाकरेंसाठी तो धक्का असेल तर भाजपची ताकद वाढवणारा असेल.
ठाकरेंसोबत काँग्रेसलाही बसणार मोठा धक्का
एकिकडे ठाकरे गटाला धक्का बसणार अशी चर्चा रंगलेली असतानाच काँग्रेसला मराठवाड्यात मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर ह्याही भाजपच्या वाटेवर आहेत. अर्चना पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर अर्चना पाटील ह्या भाजपमध्ये प्रवेश करतील या चर्चांनी जोर धरला आहे. येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडण्याची शक्यता आहे.