जामखेड भाजपने केली शिदेंची हकालपट्टी

भाजप विरोधी काम केल्याचा ठपका

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस प्रशांत शिंदे यांची भाजपने आज हकालपट्टीची घोषणा केली. शिंदे हे गेल्या दोन वर्षांपासून पक्षाविरोधात काम करत असल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली अशी घोषणा पक्षाचे तालुकाध्यक्ष अजय दादा काशिद यांनी सोमवारी केली आहे.

प्रशांत शिंदे हे जवळा परिसराच्या राजकारणातील महत्वाचे नाव आहे. त्यांच्या भावजय वैैैशाली सुभाष शिंंदे ह्या जवळा गावच्या सरपंच आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार प्रशांत शिंदे हे पाहतात.मध्यंतरी प्रशांत शिंदे हे जवळा गावच्या विकास कामासंदर्भात आमदार रोहित पवार यांना पुण्यात भेटले होते. तेव्हापासून प्रशांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सोशल मिडीयावर मध्यंतरी रंगली होती. त्यातूनच प्रशांत शिंदे यांच्यावर भाजपने कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

प्रशांत शिंदे प्रकरणावर राम शिंदे काय म्हणाले ?