Dr. Ulhas Patil : मिलिंद देवरानंतर काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का, काँग्रेसचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर, लवकरच होणार भाजपात प्रवेश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Dr. Ulhas Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष बदलाचे वारे जोमात वाहत आहे. अनेक मोठे नेते पक्षांतर करू लागले आहेत. काँग्रेस पक्षातील अनेक नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. मागच्याच आठवड्यात मुंबई काँग्रेसचे मोठे नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला बाय बाय केला होता. आता काँग्रेसचा आणखीन एक मोठा नेता काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहे. लवकरच हा नेता आपल्या लेकीसह भाजपात दाखल होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठे धक्के बसू लागले आहेत. यामुळे कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

After Milind Devar, Congress will face another big blow, the big leader of Congress is on the way of BJP, Former MP of Jalgaon Dr. Ulhas Patil Dr. Ketki Patil he will join BJP soon.

राज्यासह देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे सध्या पाहावयास मिळत आहे. माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षासोबत काडीमोड घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत करण्याची घटना ताजी असतानाच उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Dr. Ulhas Patil) हे आपली कन्या डॉ.केतकी पाटील यांच्यासह येत्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. (Dr. Ketki Patil news)

After Milind Devar, Congress will face another big blow, the big leader of Congress is on the way of BJP, Former MP of Jalgaon Dr. Ulhas Patil Dr. Ketki Patil he will join BJP soon.

भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील डॉ.केतकी पाटील यांचा शेकडो समर्थकांसह मुंबई येथे हा पक्षप्रवेश होणार आहे. पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे. तर भाजपची उत्तर महाराष्ट्रात ताकद वाढणार आहे. (Dr. Ulhas Patil)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास व प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे. या विकासयुगाच्या वाटचालीत आपणही सहभागी व्हावे म्हणून आपण कन्या डॉ केतकी पाटीलसह भाजपत प्रवेश करीत आहोत असे उल्हास पाटील यांनी सांगितलं आहे. (Dr. Ulhas Patil)

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपकडून रावेर लोकसभा मतदार संघातून केतकी पाटील या निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांना या मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Dr. Ketki Patil news)

काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबई मतदारसंघाच्या जागेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून आता त्यांना दक्षिण मुंबईत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Dr. Ulhas Patil)

शितल कलेक्शन जामखेड