Ahmednagar Latest News : अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा निवडणूक प्रमुखांची भाजपकडून घोषणा, आमदार प्रा राम शिंदेंवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 2024मध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकांची भाजपने जय्यत तयारी हाती घेतली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. माजी मंत्री तथा भाजपा नेते आमदार प्रा.राम शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. “सर्व विधानसभा प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना विजयी मिळवून देतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडी जाहीर करताना व्यक्त केला आहे.”
2024 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी भाजपाने जय्यत तयारी आरंभली आहे. राज्यात भाजपची सत्ता पुन्हा यावी यासाठी भाजपने राज्यातील 288 अनुभवी नेत्यांवर विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपने जाहीर केलेल्या या यादीत आमदार प्रा.राम शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.आमदार राम शिंदे यांची 227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.आमदार प्रा.राम शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली अगामी 2024 ची विधानसभा निवडणूक कर्जत-जामखेडमध्ये होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचा भाजपने इरादा जाहीर केला आहे. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातून 12आमदार राज्याच्या विधानसभेत जातात.अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुक प्रचार प्रमुखांची घोषणा केली आहे.कर्जत-जामखेड मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री आमदार प्रा.राम शिंदे यांच्याकडे असणार आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी विखे कुटुंबियांकडे न देता ॲड रघुनाथ बोठे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आमदार राम शिंदे यांची कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या निवडणुक प्रचार प्रमुखपदी निवड जाहीर होताच भाजपात उत्साह संचारला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी निवडलेले निवडणूक प्रचार प्रमुख खालील प्रमाणे
216 – अकोले मतदारसंघ (ST) : वैभव पिचड
217 – संगमनेर मतदारसंघ – सतिश कानवडे
218 – शिर्डी मतदारसंघ – ॲड रघुनाथ बोठे
219- कोपरगाव मतदारसंघ – माजी आमदार स्नेहलता कोल्हे
220 – श्रीरामपूर मतदारसंघ (SC) – नितीन दिनकर
221 – नेवासा मतदारसंघ- माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
222 – शेवगाव मतदारसंघ- नारायण भगवान पालवे
223 – राहुरी मतदारसंघ – जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले
224 – पारनेर मतदारसंघ – विश्वनाथ कोरडे
225 – अहमदनगर – भैय्या गंधे
226 – श्रीगोंदा – बाळासाहेब महाडिक
227 – कर्जत-जामखेड मतदारसंघ – आमदार प्रा.राम शिंदे