कर्जत : प्रविण घुलेंशिवाय इतर पक्षातील कोणते नेते भाजपात जाणार ? उत्सुकता शिगेला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार भव्य शेतकरी मेळावा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील आजी – माजी पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणार आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी कर्जतमध्ये जंगी शक्तीप्रदर्शन करणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी हाती घेतली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या इनकमिंग मोहिमेचा पहिला अंक आज पार पडणार आहे. काँग्रेस नेते प्रविण घुले यांचा प्रवेश निश्चित आहे. घुलेंशिवाय इतर पक्षातील कोण कोणते नेते भाजपात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जंगी शक्तीप्रदर्शन होणार आहे. यावेळी इतर पक्षातील अनेक महत्वाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. यावेळी विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच भव्य शेतकरी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी होणाऱ्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रम भाजपमध्ये इतर कोण जाणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे. अगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार प्रा राम शिंदे यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. आजचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम हा त्याचाच भाग आहे.
दरम्यान, आज कर्जतमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत – जामखेड भाजपने जोरदार तयारी केली आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, तसेच जिल्ह्यातील आजी – माजी आमदार तसेच पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
फडणवीस यांच्या घोषणेकडे लागले मतदारसंघाचे लक्ष
कर्जतमध्ये आज दुपारी होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जत-जामखेडकरांसाठी कोणती मोठी घोषणा करणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. अगामी 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीने आमदार प्रा राम शिंदे हे फडणवीस यांच्याकडे कोणती मोठी मागणी करणार याकडेही मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.