Devendra Fadanvis on Ashok Chavhan : आगे आगे देखो होता है क्या ? अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य !

Devendra Fadanvis on Ashok Chavhan : लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यसभेच्या काही जागांवर निवडणूक होणार आहे. या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. या भूकंपाचे केंद्र बिंदू काँग्रेस पक्ष ठरला आहे. काँग्रेस पक्षाचा मजबुत किल्ला अशी ओळख असलेल्या नांदेडच्या (Nanded) चव्हाण घराण्याने पंजाची साथ सोडली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan Congress) यांनी काँग्रेस पक्षासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Ashok Chavan Resignation, Aage Aage Dekho Hota Hai Kya? Devendra Fadanvis big statement, Devendra  Fadanvis latest news today,

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर सुचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेस पक्षातील अनेक मोठे नेते आमच्या संपर्कात आहेत, अनेकांची काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे, त्यामुळे अनेक मोठे नेते वेगळ्या पर्यायाचा शोधात आहेत. अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. अशोक चव्हाण भाजपात येणार, हे तुमच्याकडूनच ऐकतोय, असे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना गुगली टाकली.

फडणवीस पुढे म्हणाले, भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या!

महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. ‘आगे आगे देखिए होता है क्या’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पंकजा नेत्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांचं अंडरस्टँडिंग पक्कं आहे. त्यांच्या भाषणातील एक-दोन वाक्ये काढून मीडिया दाखवतो. पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता, आहे आणि पुढेही राहील, असं फडणवीसांनी सांगितलं. बिहारमध्ये नेमकं काय चाललंय याची मला माहिती नाही. मी आधी भाजपचा प्रभारी होतो, आता नाही. अलिकडच्या काळात उद्धवजी जे बोलतायत, ते फार गांभीर्याने घेऊ शकत नाही. कालच मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, गेट वेल सून, असे फडणवीस म्हणाले.