जामखेड टाइम्स वृत्तसेवा । भाजपा आमदार प्रसाद लाड (bjp mla Prasad Lad) यांच्या घरासमोर पैशाने भरलेली बॅग सापडल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. या बॅगेत सोने, पैसे, चांदी, चांदीच्या मूर्त्या, देवांच्या मुर्ती आहेत. लाखो रुपयांचा ऐवज असलेली ही बॅग कोणी ठेवली? का ठेवली? याबाबतचा तपास पोलिसांना सुरू केला आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंगा येथील घरासमोर एक संशयित बॅग आढळून आली. या घटनेने मोठी उडाली आहे. ही घटना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत लाड यांच्या सुरक्षारक्षकांनी या घटनेची माहिती प्रसाद लाड यांना दिली त्यानंतर लाड यांनी मुंबई पोलिसांना माहिती कळवली.
जामखेड तालुका मीडिया क्लबची स्थापना, अध्यक्षपदी सुदाम वराट तर सचिवपदी सत्तार शेख यांची निवड
प्रसाद लाड यांच्या घरासमोर संशयित बॅग आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होतं. दरम्यान तातडीने मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी सदर संशयित बॅग ताब्यात घेतली. या बॅगेची पाहणी केली असता, या बॅगेमध्ये जुन्या चलनाच्या नोटा, शिक्के, सोने, चांदी, चांदीच्या मुर्ती, देवांच्या मुर्ती आढळून आल्या.
जामखेडमधील रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा, नागरिकांकडून कौतुक
सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या घरासमोर अशा प्रकारे संशयित बॅग आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.सदर घटनेबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. ही बॅग कोणी ठेवली? का ठेवली ? याच्यामागे कोणते षडयंत्र होते? याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत. प्रसाद लाड यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांकडून तपासले जात आहेत. या तपासात काय निघते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.