जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षानंतर आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सरकार सत्तेवर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. दरम्यान शिंदे मंत्री मंडळाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये 38 जणांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
ठरलं ! शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात असतील 38 चेहरे, भाजप नव्या चेहर्यांना संधी देणार?
एकीकडे मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी यासाठी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यातच विधान परिषदेत निवडून आलेल्या 10 आमदारांचा शपथविधी उद्या विधान भवनात दुपारी बारा वाजता पार पडणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
मागील महिन्यामध्ये विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अतिशय चुरशीच्या वातावरणात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीमध्ये भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत आपले सर्व उमेदवार निवडून आणले होते. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आली होती, यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते.
Pradhan Mantri Pik Vima Yojana 2022 । प्रधानमंत्री पीक विमा योजना । खरीप हंगाम 2022 |अहमदनगर जिल्ह्यातील 10 पिकांसाठी 4 लाख 30 हजार हेक्टर शेतीक्षेत्र विमा संरक्षित
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला होता. या सर्व विजयी आमदारांचा शपथविधी उद्या विधानभवनामध्ये दुपारी बारा वाजता संपन्न होणार आहे.
भाजपचे आमदार राम शिंदे, आमदार प्रसाद लाड, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार प्रवीण दरेकर, आमदार उमाताई खापरे, राष्ट्रवादीकडून आमदार एकनाथ खडसे, आमदार रामराजे निंबाळकर, शिवसेनेचे आमदार सचिन आहीर, आमदार आमश्या पाडवी, काँग्रेसचे आमदार भाई जगताप या निर्वाचित विधान परिषदेच्या 10 आमदारांचा शपथविधी विधानभवनात संपन्न होणार आहे.