माजी मंत्री राम शिंदेंच्या जंगी वाढदिवसासाठी भाजप सरसावली | BJP is preparing for the former minister Ram Shinde birthday 01 January 2021
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे (former minister Ram Shinde birthday) यांच्या वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशनची कर्जत व जामखेड भाजपकडून (BJP) जोरदार तयारी करण्यात आली आहे.
राज्याचे माजी मंत्री तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांचा 01 जानेवारी 2021 रोजी वाढदिवस आहे. प्रा राम शिंदे हे मागील दोन टर्म कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. यातील पाच वर्षे त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली.
सन 2019 च्या विधान निवडणुकीत प्रा राम शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरवर्षी शिंदे समर्थक कार्यकर्ते मोठ्या दणक्यात राम शिंदे यांचा वाढदिवस साजरा करत आले आहेत. परंतू कोरोनामुळे मागील दोन वर्षे अतिशय साधेपणाने शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आमदार रोहित पवार विरूध्द राम शिंदे यांचा संघर्ष उभा महाराष्ट्राने पाहिला. आता कर्जत नगरपंचायत निवडणूकीच्या ऊर्वरीत चार जागांचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहेत. यातही हा संघर्ष उफाळून येईल. परंतू नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमांतून राम शिंदे यांनी जोरदार राजकीय वातावरण तापवत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जोश भरल्याचे दिसून आले.
भाजपच्या कर्जत – जामखेडमधील कार्यकर्त्यांनी 1 जानेवारी 2022 रोजी प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचे नियोजन करत मतदारसंघात जोरदार वातावरण निर्मिती करण्याचे नियोजन केले आहे. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा, सत्कार समारंभ, मदत वाटप सह आदी भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
1 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून राम शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे. दोन्ही तालुक्यात होणाऱ्या कार्यक्रमातून भाजप जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान राम शिंदे यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जायचा, मात्र यंदा भाजपचे कार्यकर्ते राम शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून मतदारसंघात कशी वातावरण निर्मित करणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.