जामखेड टाईम्स वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीसह प्रमुख कार्यकर्त्यांची 3 फेब्रुवारी रोजी अहमदनगरमध्ये बैठक पार पडणार आहे. बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. बैठकीस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा प्रसिध्दी प्रमुख सचिन पोटरे यांनी केले आहे.
3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे होणाऱ्या पक्षाच्या बैठकीस पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे व माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे हे असणार आहेत.
खासदार डाॅ सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते , आमदार मोनिकताई राजळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रदेश सदस्य भानुदास बेरड सह आदींच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडणार आहे.
अहमदनगर जिल्हा भाजपच्या बैठकीत मायक्रो डोनेशन,1 बूथ 30 युथ, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, मन की बात, सुदृढ बालक स्पर्धा, आगामी येणाऱ्या नगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकी बाबत चर्चा करणे, मोर्चे व आघाड्या यांच्या कार्यकारण्याबाबत चर्चा होणार आहे. या चिंतन बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
अहमदनगर जिल्हा भाजपची 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्या कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व भाजपच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे व दिलीप भालसिंग यांनी केले आहे.