जामखेड टाईम्स वृत्तसेवा | दि ७ जानेवारी | अहमदनगर जिल्हा दक्षिणचे खा.डॉ. सुजय विखे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जे कोरोनाचे संकट ओढवले आहे. तसेच विखे कुटुंबाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र आणि देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. यासर्वाची सुखरूप-पणे सुटका व्हावी आणि ते लवकर बरे व्हावे यासाठी कर्जत येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी श्री संत सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते.
यावेळी विखे कुटुंबीयांसह महाराष्ट्र देश आणि सबंध जगावरचे कोरोनाचे संकट टळू दे..! असे साकडे भाजपाच्या पदाधिकार्यांच्यावतीने श्री संत सदगुरु गोदड महाराज यांना घालण्यात आले. यावेळी कर्जत येथील प्रसिद्ध उद्योजक अरविंद काळोखे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, भाजपा किसान मोर्चाचे सुनील यादव, दादासाहेब सोनमाळी काकासाहेब धांडे, दिग्विजय देशमुख, गणेश क्षीरसागर,अनिल गदादे, रावसाहेब खराडे, रिपाइंचे संजय भैलुमे, विनोद दळवी, डॉ.संदीप बरबडे, सागर कांबळे, काका ढेरे आदि. उपस्थित होते.