political earthquake in Maharashtra? | चंद्रकांत पाटलांनी दिला तीन दिवसांचा अल्टिमेटम; महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार ?
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Political earthquake in Maharashtra? | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ आहेत. रोज कोणी ना कोणी भाजपचा नेता महाविकास आघाडी सरकार कोसळणार असे विधान करताना दिसत आहे.
आता याच संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानावरुन राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं विधान करत चंद्रकांत पाटील यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे.(chandrakant patil says,dont call me former minister everything will be understood in two three days)
पिंपरी चिंचवडच्या देहूमध्ये एका कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil)आले होते. त्यावेळी मंचावरून सूत्रसंचालकानं वारंवार त्यांचा उल्लेख माजी मंत्री असा केला. त्यावर लागलीच चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका असं विधान केलं. येत्या दोन ते तीन दिवसांत कळेल, अशी पुष्टी जोडायलाही ते यावेळी विसरले नाहीत. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात खरचं राजकीय भूकंप होणार का ? याचीच चर्चा आता रंगू लागली आहे.(Chandrakant Patil gives three-day ultimatum; Will there be a political earthquake in Maharashtra?)
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून भाजपची साथ सोडून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन केलं. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजप पुन्हा महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी ‘ऑपरेशन लोटस’ सुरू करणारी (Operation Lotus launched in Maharashtra?)अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
भाजप नेतेही वेळोवेळी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल असं विधान करताना दिसतात.याआधी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,(devendra fadanvis, raosaheb danave ) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अशी वक्तव्य केली आहेत.महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेतही केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ‘महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघालेल्यांना सांगू इच्छितो की, तुमचा काळ संपलाय. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे’, असा विश्वास व्यक्त करत यावेळी राणेंनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बळ आणण्याचा प्रयत्न केला होता.
आम्ही लवकरच सत्तेत येऊ असं विधान भाजपचे नेते गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं करतायेत.मात्र सत्ता स्थापन करण्यात अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी हे विधान गंमतीने केलं की खरंच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होतोय, हे जाणून घेण्यासाठी ते म्हणतात तशी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागेल. (Chandrakant Patil gives three-day ultimatum; Will there be a political earthquake in Maharashtra?)
web title: Chandrakant Patil gives three day ultimatum Will there be a political earthquake in Maharashtra?