जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसाच्या आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा.राम शिंदे यांचाही सहभाग असणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 8 एप्रिल रोजी होणार आहे. विशेष विमानाने महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आयोध्या दौऱ्यावर जाणार आहे.
8 एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शिष्टमंडळासह दोन दिवसांचा उत्तर प्रदेश दोरा करणार आहेत. या दौऱ्यात ते आयोध्याला भेट देऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत आमदार प्रा.राम शिंदे, आमदार आशिष शेलार, मोहित कंबोज, सह आदी भाजप नेत्यांचा सहभाग असणार आहे. या दौऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासमवेत महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आयोध्येतील राम मंदिर उभारणी कामाची पाहणी करणार आहेत.
9 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आयोध्येतील विविध भागांना भेटी देणार आहेत. आयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी शिवसेनेच्या वतीने धनुष्यबाणाची महापुजा केली जाणार आहे. त्यानंतर महापूजा केलेल्या हा धनुष्यबाण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात नेला जाणार आहे. अगामी निवडणूकांच्या दृष्टीने शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे.