dr ulhas patil news : अखेर लेकीसह काँग्रेसचा बडा नेता भाजपात दाखल, महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, माजी खासदार डाॅ उल्हास पाटील व डाॅ केतकी पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : dr ulhas patil news : महाराष्ट्र काँग्रेसने हकालपट्टी केलेल्या काँग्रेस नेत्याने आपल्या लेकीसह बुधवारी भारतीय जनता पार्टीत (BJP) जाहीर प्रवेश केला. माजी खासदार डाॅ उल्हास पाटील व डाॅ केतकी पाटील (Dr. Ketki Patil news) यांनी शेकडो समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला. उल्हास पाटील यांच्या भाजपात प्रवेशामुळे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. (Finally, big leader of Congress along with daughter joins BJP, political events speed up in Maharashtra, former MP Dr. Ulhas Patil and Dr. Ketki Patil join BJP with hundreds of supporters.)

dr ulhas patil news,Finally, big leader of Congress along with daughter joins BJP, former MP Dr. Ulhas Patil and Dr. Ketki Patil join BJP with hundreds of supporters.

माजी खासदार डाॅ उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डाॅ केतकी पाटील (Dr. Ketki Patil news) हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. याबाबतचे वृत्त माध्यमांमधून प्रकाशित होत होते. पाटील हे काँग्रेसला राम राम ठोकणार याची खात्री होताच महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्यासह तिघांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली होती. या कारवाईवर डाॅ उल्हास पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुढे काय ? यावर दोन दिवसांत निर्णय घेऊ असे त्यांनी जाहीर केले होते. (dr ulhas patil news )

अखेर आज बुधवारी डाॅ उल्हास पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा मुंबईत पार पडला.कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांची कन्या केतकी पाटील (Dr. Ketki Patil news) यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) भाजपची ताकद अजून वाढली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मोठी रणनिती आखली असून विद्यमान खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांचा पत्ता कट करून उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. तत्पुर्वी गेल्या काही दिवसांपासून केतकी पाटील यांनी या मतदारसंघात निवडणूक तयारी सुरु केली होती. आता त्यांनी भाजप प्रवेश करताच या तयारीला बळ मिळणार आहे. (dr ulhas patil news )

dr ulhas patil news,Finally, big leader of Congress along with daughter joins BJP, former MP Dr. Ulhas Patil and Dr. Ketki Patil join BJP with hundreds of supporters.

गेल्या अनेक महिन्यांपासून डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या केतकी पाटील (Dr. Ketki Patil news) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यातच २२ जानेवारीच्या कार्यक्रमानंतर उल्हास पाटलांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आज उल्हास पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डॉ. उल्हास पाटील यांनी १९९८ साली कॉंग्रेसमधून निवडणूक लढवली होती. त्यांना त्यावेळी अवघा तेरा महिन्याचा काळ मिळाला होता. त्यानंतर मात्र मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचा पराभव केला. (dr ulhas patil news )

dr ulhas patil news,Finally, big leader of Congress along with daughter joins BJP, former MP Dr. Ulhas Patil and Dr. Ketki Patil join BJP with hundreds of supporters.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उल्हास पाटील आणि केतकी पाटील (Dr. Ketki Patil news) यांच्या भाजप प्रवेशाने रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी निवडणुकीत रक्षा खडसे यांना डावलून केतकी पाटील यांना भाजप उमेदवारी देणार का याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. (dr ulhas patil news )

डाॅ केतकी पाटील यांची महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

माजी खासदार डाॅ उल्हास पाटील व त्यांची कन्या डाॅ केतकी पाटील यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. केतकी पाटील यांनी पक्षात प्रवेश करताच त्यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपने केतकी पाटील (Dr. Ketki Patil news) यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. केतकी पाटील यांना पक्षाने पहिल्याच दिवसापासून राजकीय ताकद देण्यास सुरूवात केल्याने खासदार रक्षा खडसे यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. (dr ulhas patil news )

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुंबई येथे जळगावचे काँग्रेस नेते माजी खासदार श्री. उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील (Dr. Ketki Patil news) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचे पक्षात स्वागत केले. तसेच, डॉ. केतकी पाटील यांचे नेतृत्व गुण व संघटन कौशल्याची दखल घेत त्यांना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले. श्री उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! (dr ulhas patil news )

मुंबई येथे आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळेजी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील (Dr. Ketki Patil news) यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीच्या वाटेने मार्गस्थ करत असून या प्रवासात डॉ. उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांचे योगदान लाभेल असा विश्वास यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. (dr ulhas patil news )