जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी वेगाने हाती घेतली आहे. काही दिवसांपुर्वी पक्षाने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांच्या तालुकाध्यक्ष पदांसाठी मुलाखती पार पडल्या होत्या. जामखेड तालुक्यातून इच्छुकांची सर्वाधिक संख्या होती. परंतू पक्षाने विद्यमान तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांची तालुकाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे.
कर्जत तालुकाध्यक्षपदासाठी 6 जण इच्छूक होते. डाॅ सुनिल गावडे यांचा तालुकाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला होता. पक्षाने कर्जत तालुकाध्यक्षपदी गावडे यांना पुन्हा संधी न देता शेखर खरमरे यांना तालुकाध्यक्षपदाची संधी दिली. खरमरे हे अतिशय अभ्यासू, आक्रमक असे नेतृत्व आहे. ते सोशल मीडियावर पक्षाची बाजू अतिशय आक्रमकपणे मांडत असतात. खरमरे यांचा लढाऊ बाणा पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहे. गेल्या तीन चार वर्षांत खरमरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाची बाजू नेटाने संभाळली होती. खरमरे हे आमदार प्रा.राम शिंदे यांचे अतिशय कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते यापुर्वी तालुका सरचिटणीस म्हणून पक्षात कार्यकर्त होते. त्यांना पक्षाने बढती दिली आहे.
कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांच्या तालुकाध्यक्षपदी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या समर्थकांची वर्णी लागली आहे. अजय दादा काशीद व शेखर खरमरे या दोन्ही नेत्यांना आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार. भाजपचा बालेकिल्ला ही मतदारसंघाची ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जीवाचं रान करावं लागणार आहे.
दरम्यान अजय दादा काशीद व शेखर खरमरे यांची तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर झाल्याबद्दल आमदार प्रा राम शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच दोन्ही नेत्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने भाजपचे अहमदनगर दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी अहमदनगर दक्षिणेतील तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. त्या खालील प्रमाणे
राहुरी : सुरेश पंढरीनाथ बानकर , ब्राम्हणी ता . राहुरी
नगर तालुका : शशीकांत ऊर्फ दिपक पोपट कार्ले खंडाळा ता. नगर
पारनेर : राहुल प्रकाशराव शिंदे , रांजणगाव मशीद ता . पारनेर
जामखेड : अजय विष्णू काशीद , जामखेड ता. जामखेड
कर्जत : चंद्रशेखर विठ्ठल खरमरे , कोंभळी ता . कर्जत
श्रीगोंदा : संदीप बलभीम नागवडे , वांगदरी , ता . श्रीगोंदा