BJP Leader Namdev Raut Announces to Quit BJP | रोहित पवार विरूध्द राम शिंदे संघर्ष उफाळला : नामदेव राऊत राष्ट्रवादीच्या वाटेवर
नामदेव राऊत यांचा भाजपला रामराम : कर्जत भाजपला पडले मोठे भगदाड
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | BJP leader Namdev Raut announces to quit BJP | राज्याच्या राजकारणात शिवसेना भाजप यांचा कलगीतुरा रंगलेला असतानाच आता कर्जत – जामखेड मतदारसंघातही भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा कलगीतुरा रंगला आहे. एकिकडे माजी मंत्री राम शिंदे (Former Minister Ram Shinde) हे मतदारसंघात सक्रीय होऊन आक्रमकपणे आमदार रोहित पवारांविरोधात (MLA Rohit Pawar) आरोपांच्या फैरी झाडू लागल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. यामुळे मतदारसंघात सध्या रोहित पवार विरूध्द राम शिंदे संघर्ष उफाळून आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने राम शिंदे यांच्या दुखऱ्या नसेवर घाव घालत थेट भाजपलाच भगदाड पाडण्याचा धडाका लावला आहे. यामुळे भाजप पुरती घायाळ झाली आहे. सध्या राजकीय भूकंपाने कर्जत तालुका हादरून गेला आहे.
चर्चेतल्या बातम्या