जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्यात मागील चार दिवसांपासून मोठे राजकीय नाट्य सुरू आहे. मंत्री एकनाथ शिंदेंची बंडखोरी निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. अश्यातच मागील अडीच वर्षांपासून विरोधात असलेल्या भाजपबरोबर सत्ता स्थापनेच्या हालचाली शिंदे गटाकडून सुरू आहेत. सत्तेचा हा डाव यशस्वी झाल्यास पुन्हा एकदा कर्जत जामखेड मतदारसंघाला मंत्रीपद मिळू शकते. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांसह शिंदे समर्थकांना आमदार राम शिंदे यांच्या मंत्रीपदाचे वेध लागले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रा राम शिंदे हे राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकाभिमुख सरकार आल्यानंतरच आमचा संघर्ष थांबेल असे महत्वपूर्ण वक्तव्य केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शिवसेनेत मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्याची बातमी समोर आली आणि राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला.
तेव्हापासून मागील चार दिवसांत एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड शमलेले नाही उलट एकनाथ शिंदे गटाला आता 50 च्या आसपास आमदारांचा सक्रिय पाठिंबा मिळाला आहे. हे सर्व आमदार गुवाहटीत आहेत. राज्यात शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी सरकार कोसळून भाजप आणि शिंदेसेना युतीचे सरकार अस्तित्वात येऊ शकते असा अंदाज व्यक्त होत आहे.
ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही
दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित आमदार प्रा राम शिंदे हे विजयोत्सव साजरा करण्यासाठी बुधवारी आपल्या होम ग्राऊंड असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात दाखल झाले होते. राम शिंदे यांचे कर्जत – जामखेडकरांनी केलेले भव्यदिव्य स्वागत राजकीय वातावरण ढवळून काढणारे ठरले, याशिवाय कर्जत जामखेड मतदारसंघासह जिल्ह्यातील भाजपला नवसंजीवनी देणारे ठरले.
शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीची कारवाई, कारखान्याची जमीन केली जप्त !
राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाल्याने अडीच वर्षे विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपची सत्ता येणार असे चित्र निर्माण झाले आहे. प्रा राम शिंदे आमदार व्हायला आणि भाजपची सत्ता यायचा अचूक मुहूर्त निघाल्याने कर्जत – जामखेड मतदारसंघासह राज्यातील शिंदे समर्थकांना लाल दिव्याचे वेध लागले आहेत.
आमदार प्रा राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मागील पाच वर्षे महत्वाच्या खात्यांचे मंत्री होते. परंतू 2019 च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत शिंदे यांच्या गोटातील अनेकांनी पवारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली होती.
… म्हणून जनतेचा संताप उफाळून आला
मंत्रीपदाच्या माध्यमांतून प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघात करोडोंचा निधी खेचून आणला होता, पक्षातील कार्यकर्ते नेते यांना राजकीय ताकद दिली होती. रस्त्यावरचे कार्यकर्ते अलिशान गाड्यांतून फिरत होते. शिंदे यांच्या भोवती हुजरेगिरी करणारे बडवे आणि लाभार्थ्यांचा गराडा वाढला होता. जनतेशी नाळ तुटली होती. काही कार्यकर्ते स्वता: मंत्री असल्याच्या अविर्भाव वावरत होते, गावागावात मुजोरी करत होते. यातून जनतेत भाजपविरोधात संताप वाढला होता.
विधानसभेचा पराभव
मात्र दुसरीकडे ताकदवान कार्यकर्त्यांच्या बळावर आपण सहज जिंकू हा आत्मविश्वास भाजपला विधानसभा निवडणुकीत महागात पडला. 25 वर्षांपासूनचा भाजपचा मजबुत बालेकिल्ला पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडला. राम शिंदे यांना 40 हजारापेक्षा अधिक मतांनी विधानसभा निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाला अनेक कारणे कारणीभूत होती. पराभवानंतर शिंदे यांनी पराभवाच्या कारणांचा अभ्यास केला. चिंतन केले. हे करत असताना त्यांनी पक्षातील कुणाही स्थानिकांवर आगपाखड करत पराभवाचे खापर फोडले नाही.
तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा,राज्यपालांकडे बीडच्या शेतकऱ्याची मागणी !
विधानसभा निवडणूकीनंतरचा संघर्ष
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. स्थानिक आमदार राष्ट्रवादीचा असल्याने भाजपातील महत्वाचे शिलेदार राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले. त्यानंतर कर्जतची नगरपरिषद हातातुन गेली. होम ग्राऊंडवर पक्षाची पडझड सुरु होती. अनेक जण पक्षांतराच्या तयारीत होते. मतदारसंघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा संघर्ष अधिक पेटला होता. या सर्व राजकीय घडामोडींवर हतबल न होता शिंदे यांनी आपला एकाकी लढा सुरुच ठेवला होता.
पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने राम शिंदेंना मिळाला न्याय
तर दुसरीकडे आमदारकी गेल्यावर राम शिंदे हे पक्षात अधिक सक्रिय झाले. पक्षात राजकीय वजन वाढवण्यात त्यांनी मेहनत घ्यायला सुरूवात केली. टीम देवेंद्र फडणीसचा भाग बनून मिळेल ती मोहिम फत्ते करत राहिले. प्रदेश उपाध्यक्ष, कोअर कमिटी सदस्य, बारामती लोकसभा मतदारसंघ प्रभारी अशी जबाबदारी पक्षाने दिली. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीच्या उमेदवारीच्या यादीत राम शिंदे यांचे नाव दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आले होते. परंतू त्यांची राज्यसभेची लाॅटरी हुकली मात्र पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला ठणकावले, तुमच्या धमक्यांना आम्ही भिक घालत नाही
राम शिंदे यांचे पक्षातील वजन वाढले
विधानपरिषद निवडणुकीचे निकाल समोर आले आणि राम शिंदे हे राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदार ठरले. शिंदे यांचे पक्षातील राजकीय वजन किती महत्वपूर्ण आणि प्रभावशाली आहे याची प्रचिती यानिमित्ताने राज्याला आली. राम शिंदे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने राम शिंदे हे सर्वाधिक मते घेऊन विधानपरिषदेेचे आमदार बनले.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जे लोक राम शिंदे यांचं राजकीय अस्तित्व संपल्यात जमा आहे असे वातावरण निर्माण करत होते त्यांनाही यानिमित्ताने मोठी चपराक बसली आहे.
.. अन् राम शिंदेंच्या आश्रूंचा बांध फुटला !
राम शिंदे आमदार झाल्याने भाजपात नवचैतन्य
आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघावर कब्जा मिळवल्यानंतर स्थानिक भाजपा ढेपाळून गेली होती, मात्र तीन वर्षानंतर प्रा राम शिंदे हे पुन्हा आमदार बनले आणि भाजपात नवचैतन्य आले. राम शिंदे हे दोनदा आमदार आणि मंत्री झाल्यानंतरही इतका जोश आणि उत्साह मतदारसंघात दिसला नव्हता त्याहून दहा पट अधिक उत्साह राम शिंदे यांच्या विधानपरिषद विजयोत्सव दौऱ्यात दिसून आला होता. यामुुळे मतदारसंघात भाजपचा आत्मविश्वास आता अधिक दुणावला आहे.
साहेब लाल दिवा घेऊन लवकर या ……
दरम्यान राज्याच्या राजकारणात सत्ताबदलाचे ‘वारे’ वाहत असतानाच राम शिंदे हे कर्जत – जामखेड मतदारसंघात आपला विधानपरिषदेचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी दाखल झाले होते. या दौऱ्यात राम शिंदे यांचे स्वागत करणारा प्रत्येक जण साहेब आपलं सरकार पुन्हा येणार असचं दिसतयं,साहेब लाल दिवा घेऊन लवकर मतदारसंघात या.. आजच्या पेक्षा भव्यदिव्य सत्कार करू.. असे बोलत होता.. यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील जनतेला प्रा राम शिंदे यांच्या मंत्रीपदाचे वेध लागलेत आहेत.
आमदार राम शिंदे विजयोत्सव : सिध्दटेक ते जामखेड गुलालाची प्रचंड उधळण, राम शिंदेंचे मतदारसंघात अभूतपूर्व स्वागत, भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन !
पन्नास वर्षातील सर्व रेकॉर्ड शिंदे यांनी मोडले होते
विकासाच्या बाबतीत सर्वाधिक मागास मतदारसंघ म्हणून कर्जत जामखेडची राज्यात ओळख होती, परंतू फडणवीस सरकारच्या काळात प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी करोडोंचा निधी मतदारसंघात खेचून आणला होता. मागील पन्नास वर्षातील सर्व रेकॉर्ड शिंदे यांनी मोडले होते.
राज्यात सत्ता कुणाचीही येवो मतदारसंघाला निधी मात्र कच्चून
शिंदे यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे रोहित पवार हे आमदार बनले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. मग काय रोहित पवारांनी मतदारसंघाचे सुक्ष्म नियोजन आखत वेगवेगळ्या प्रकल्पांना मंजूरी आणली. पवार महाविकास आघाडी सरकारचा महत्वाचा भाग असल्याने मतदारसंघात करोडोंचा निधी येऊ लागला होता.
आता पुन्हा सरकार बदलाच्या हालचाली वेगात सुरू आहेत. भाजपचे सरकार आल्यास शिंदे यांची मंत्रीपदी वर्णी लागेल आणि मतदारसंघात पुन्हा करोडोंचा निधी येण्याचा मार्ग मोकळा होईल. एकुणच सरकार कोणाचेही येवो आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून मतदारसंघाला पुढील दोन अडीच वर्षे निधी मात्र कमी पडणार नाही. विकासाचा अनुशेष भरून निघण्यासाठी दोन्ही नेत्यांचा मतदारसंघाला मोठा फायदा होईल अशीही चर्चा मतदारसंघात रंगली आहे.