जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातही हर घर तिरंगा जनजागृती मोहिम सुरू असल्याने गावोगावचे वातावरण तिरंगामय झाले आहे. अश्यातच भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यात निघालेली तिरंगा बाईक रॅली एका वेगळ्याच कारणाने राज्यात चर्चेत आली आहे.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालूका भाजपच्या वतीने आज राशीन ते मिरजगाव या मार्गावर भव्यदिव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीतून सर्वाधिक लक्ष वेधले ते आमदार राम शिंदे यांच्या लूकने. अस्सल मराठमोळ्या पेहरावातील राम शिंदे यांना पाहून अनेक जण साहेब लय भारी.. नादच खूळा असे म्हणत जल्लोषात रॅलीत सहभागी होताना दिसत होते.
दरम्यान आमदार राम शिंदे यांचा तिरंगा रॅलीत बुलेटवरून प्रवास करतानाचा फोटो सोशल मिडीयावर जोरदार वायरल झाला आहे. राम शिंदे यांच्या मराठमोळ्या रांगड्या अश्या अस्सल गावरान लुकची राज्यात चर्चा रंगली आहे.
भाजपने राशीन ते मिरजगाव अशी भव्य तिरंगा रॅली आज काढली होती. या रॅलीत आमदार राम शिंदे हे बुलेट चालवत सहभागी झाले होते. पांढरा शुभ्र पोशाख आणि डोक्यावर गांधी टोपी आणि बुलेटला तिरंगा ध्वज असा अस्सल पेहराव शिंदे यांनी केला होता. रॅलीच्या अग्रस्थानी आमदार राम शिंदे यांची बुलेट आणि पाठीमागे शेकडो कार्यकर्त्यांच्या मोटारसायकली जात असताना नागरिकांचे राम शिंदे यांच्या अस्सल अश्या गावरान लूकने सर्वाधिक लक्ष वेधले.
भाजपने आज कर्जत तालुक्यात काढलेल्या तिरंगा बाईक रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला. या रॅलीच्या माध्यमांतून भाजपात मोठा उत्साह संचारल्याचे दिसून आले. त्याचबरोबर आमदार राम शिंदे यांच्या अस्सल गावरान लुकला पाहून कार्यकर्ते आमच्या शिंदे साहेबांचा नादच खूळा असे म्हणत जल्लोषात रॅलीत सहभागी होताना दिसत होते. एकुणच कर्जत तालुक्यात राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली तिरंगा बाईक रॅलीची राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे.