Modi@9 Abhiyan : जामखेड भाजपच्या वतीने महाजनसंपर्क अभियानाचे आयोजन, आमदार प्रा.राम शिंदे उपस्थित पार पडणार मोटारसायकल रॅली व टिफीन बैठक !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Modi@9 Abhiyan : देशात मोदी सरकार सत्तेवर येऊन 9 वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.या कार्यक्रमांच्या माध्यमांतून मोदी सरकारने 9 वर्षाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली जात आहे. उद्या रविवारी जामखेड शहरात महाजनसंपर्क अभियानातंर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी जामखेड शहरात मोदी@9 अभियान हा कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 9 वर्षे यशस्वीरित्या पुर्ण केल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने जामखेड शहरात महाजनसंपर्क अभियान हाती घेतले जाणार आहे. या निमित्ताने जामखेड शहरात रविवारी सकाळी 8 वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली जामखेड बाजार समितीपासून निघणार आहे. तर नागेश्वर मंदिराजवळ या रॅलीची समाप्ती होणार आहे.
मोटार सायकल रॅली समाप्तीनंतर सकाळी 9 वाजता नागेश्वर मंदिर परिसरात टिफीन बैठक होणार आहे. या बैठकीस येणाऱ्या कार्यकर्त्यांनी जेवणाचे डबे सोबत आणण्याचे अवाहन करण्यात आले आहे. नागेश्वर मंदिर परिसरात पार पडणाऱ्या टिफीन बैठक अर्थात स्नेह भोजनाच्या या अनोख्या कार्यक्रमात आमदार प्रा.राम शिंदे हे उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
टिफीन बैठक संपल्यानंतर आमदार प्रा.राम शिंदे हे दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.ही पत्रकार परिषद जामखेड शहरातील महावीर मंगल कार्यालयात पार पडणार आहे.मोदी सरकार मागील 9 वर्षाच्या काळात राबवल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्याबरोबरच पक्षाची अगामी वाटचाल तसेच इतर अनेक महत्वाच्या विषयांवर आमदार प्रा राम शिंदे हे पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 9 वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे राबवल्याच्या निमित्त आयोजीत महाजनसंपर्क अभियान कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.