Kirit Somaiya Big Breaking | मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्यांना केले स्थानबध्द !

फडणवीस, दरेकर, पाटील यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांचा घोटाळा दाबण्यासाठीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी रविवारी केला आहे. सोमय्या यांनी घराखाली पोलिस उभे असल्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामुळे पुन्हा एकदा सोमय्या चर्चेत आले आहेत. (Serious allegations by Kirit Somaiya) Mumbai Police has arrested Kirit Somaiya 

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची आणखी माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरला (Kolhapur) जाणार आहे.परंतु माझ्या दौऱ्यावर ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray government) प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्यासाठी माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवले आहेत. मला गणेश विसर्जनासाठीही जाऊ दिले जात नाही,’ अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.Mumbai Police has arrested Kirit Somaiya 

मी कोल्हापूरला जाणारच – सोमय्या

राज्य सरकारने माझ्या घरात पोलीस पाठवले आहेत.मला कोल्हापूरला जाऊ दिले जात नाहीये, असा दावा सोमय्यांनी केलाय. तसेच मला कोणीही कितीही अडवले तरी कोल्हापूरला मी जाणारच असं ठामपणे त्यांनी सांगितलं आहे.Mumbai Police has arrested Kirit Somaiya 

सोमय्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मी मुलुंडमझील निलम नगरहून आज संध्याकाळी ५.३० ला निघणार असून प्रथम मी गिरगाव चौपाटीवर जाऊन गणेश विसर्जन करेन आणि तिथून संध्याकाळी ७.१५ वाजता CSMT स्टेशनहून महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडून मी कोल्हापूरला रवाना होईन, असे सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.Mumbai Police has arrested Kirit Somaiya 

दरम्यान, माझा दौरा थांबवण्याचा कितीही प्रयत्न करण्यात आला तरी मी आज महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला निघणारच. मी तेथे जाऊन कागल येथे असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याची पाहणी करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात प्रवेश करून नये यासाठी कोल्हापुर जिल्हा प्रशासनाकडून कलम 144 लावण्यात आले आहे.

सोमय्या यांना स्थानबद्ध केलं, राज्य सरकारचा निषेध- फडणवीस

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis Tweet  यांनी ट्विट करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करणं चुकीचं असल्याचं म्हटंलय. तसेच काहीही झालं तरी आमचा राज्य सरकारविरोधातील संर्घष सुरुच राहणार आहे, असं ठणकाऊन सांगितलंय. दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्विटरवर सरकारचा निषेध केला आहे.Mumbai Police has arrested Kirit Somaiya