उदयसिंह पवारांच्या पुढाकारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 200 शुभेच्छापत्रे रवाना !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 200 शुभेच्छापत्रे आज पोस्टाने रवाना करण्यात आले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस उदयसिंह पवार यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठ वर्षांत अनेक लोककल्याणकारी योजना राबवत सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात सेवा पंधरवडा राबवला जात आहे. या काळात विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भाजपकडून देशभरात विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला जात आहे.
गेल्या आठ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जनकल्याणकारी योजनांबद्दल भाजपकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहेेत. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जामखेड तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून 200 शुभेच्छापत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे पाठवण्यात आले. पत्रे पाठवण्याची जबाबदारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस उदयसिंह पवार यांच्यावर होती. पवार यांनी 200 शुभेच्छापत्रे आज पोस्टाने पंतप्रधानांना पाठवली.
यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, जिल्हा सरचिटणीस उदयसिंह पवार, रविदादा सुरवसे, उपाध्यक्ष गणेश लटके, तात्याराम पोकळे, तुकाराम कुमटकर, रमेश ढगे, स्वप्नील मोटे, वैभव कार्ले, राम भोसले, जालिंदर चव्हाण, महेश मासाळ, दत्ता गिरी, अर्जुन जाधव, धनंजय कारंडे, ता.उपाध्यक्ष अजय सातव सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
“पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशासाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्यामार्फत अनेक योजना राबविल्या जात आहेत आणि या योजना फक्त कागदोपत्री नसून देशातील दिन, दलित, वंचित, महिला, युवक, शेतकरी, अपंग या सर्वांना त्याचा लाभ मिळत आहे. खऱ्या अर्थाने हे सामान्य लोकांचे सरकार आहे आणि लोकांच्या असणाऱ्या आशा आकांशा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्याबरोबरच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जामखेड तालुक्यातून 200 शुभेच्छापत्रे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस उदयसिंह पवार यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.”