चंद्रकांत पाटलांचा फुत्कार; म्हणाले संजय राऊतांनी निवडणुक जिंकून दाखवावी
चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (०६ ऑगस्ट रोजी) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. एका प्रश्नावर चंद्रकांतदादांनी आक्रमक होत संजय राऊत हे अमेरिकेची निवडणूक सुद्धा लढवू शकतात. यात मला शंका नाही. पण, त्यांची तेवढी क्षमता आहे का ? त्यांनी मुंबई महापालिकेत कुठल्याही जागेवरून लढवून दाखवावं ते जिंकू शकत नाहीत असे खुले चॅलेंज चंद्रकांतदादांनी दिल्याने आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतलीचंद्रकांत पाटील यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप-मनसे युतींच्या चर्चेवरही भाष्य केलं. युतीचा कोणताच प्रस्ताव या बैठकीत नव्हता. हे दोन पक्ष एकत्र येवून निवडणुका लढवतील असा कुठलाच विचार सध्या तरी नाही असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, राज ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ पाहिला. भाषण ऐकलं होतं तरी काही शंका होत्या त्या दूर करण्यासाठी राज यांच्या भेटीसाठी आलो होतो. माणसाच्या दोन भूमिका असतात. माणूस म्हणून त्यांना काय वाटतं हे मला जाणून घ्यायचे होतं, असं पाटील म्हणाले.
खासदार संजय राऊत यांच्याविषयी विचारलेल्या एका प्रश्नांवर चंद्रकांत पाटलांचा मुडच बदलून गेला. पाटलांनी आक्रमक होत संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत एक सेफ जागा निवडावी. त्याठिकाणी निवडणूक लढवावी आणि ती जिंकून दाखवावी. जेणेकरुन त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव होईल, असं म्हणत त्यांनी राऊतांविरोधात हल्ला चढवला.