जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। विधानपरिषद निवडणुकीतून विजयाचा गुलाल अंगावर घेऊन चोंडीत दाखल झालेल्या आमदार राम शिंदेंचे चोंडीकरांनी जंगी स्वागत केले. जन्मभूमीतील बालगोपालांसह आबालवृद्ध, तरूणांनी केलेल्या जंगी स्वागताने शिंदे भारावून गेले होते.
नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणूकीत राम शिंदे हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. विजयानंतर ते बुधवारी आपली जन्मभूमी चोंडीत दाखल झाले. शिंदे हे चोंडीत दाखल होऊन काही मिनटे होत नाही तोच चोंडीत पावसाने हजेरी लावली.
भर पावसात राम शिंदेंची जंगी मिरवणुक सुरू होती. अख्खी चोंडी गुलालात न्हाऊन निघाली. शिंदे यांनी मिरवणुकीनंतर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले.
आमदार राम शिंदे विजयोत्सव : सिध्दटेक ते जामखेड गुलालाची प्रचंड उधळण, राम शिंदेंचे मतदारसंघात अभूतपूर्व स्वागत, भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन !
त्यानंतर राम शिंदे आपल्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी आईला पहाताच राम शिंदे यांच्या आश्रूंचा बांध फुटला. यावेळी राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांनी आपल्या लाडक्या लेकाला जवळ घेतले. आई आणि लेकाची गळाभेट झाली. दोघांच्याही डोळ्यात आश्रू होते. हे दृश्य पाहून उपस्थित जनसमुदाय भावूक झाला. सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. यावेळी राम शिंदे यांनी आपल्या आईचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले.
आपला लेक तिसर्यांदा आमदार झाला याचा आनंद भामाबाई शिंदे यांच्या चेहर्यावर दिसत होता. वाह रे माझ्या पठ्ठ्या अशीच भावना त्यांच्या मनात आली असेल हेच राम शिंदे यांच्या बंगल्यावरील दृश्यातून स्पष्ट दिसत होते.
दरम्यान राम शिंदे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर वर्षभरातच राम शिंदे यांच्या वडिलांचे आजारपणात निधन झाले होते. वडीलांच्या पश्चात झालेल्या पहिल्या निवडणूकीत राम शिंदे यांनी राज्यात सर्वाधिक मतांनी विजय संपादन केला. हा विजय पाहण्यासाठी आपले वडील असायला हवे होते, हीच भावना राम शिंदे यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. एकूणच राम शिंदे यांच्या बंगल्यावरील वातावरण भावनिक झाले होते.
दरम्यान राम शिंदे यांचे बुधवारी कर्जत – जामखेड मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आले, राम शिंदे आमदार झाल्याचा प्रचंड आनंद शिंदे समर्थकांना झाला. गेल्या तीन वर्षांपासून कर्जत – जामखेड भाजपा आलेली मरगळ दुर झाली. नव्या जोशात भाजपा कार्यकर्ते पुन्हा सक्रीय झाले. पक्षात नवचैतन्य आले.
उद्योजक विशाल शिंदे, भाजप जिल्हा सरचिटणीस, पांडुरंग उबाळे, उपसरपंंच कल्याण शिंदे, माजी सरपंच आप्पासाहेब उबाळे, विलास कोकाटे, सतिश चव्हाण, अशोक देवकर, रविंद्र विठ्ठल शिंदे, सतिष बाबासाहेब शिंदे,अतिष सुुरेश शिंदे, सुजित शिंदे, विवेक शिंदे, बापुसाहेब बाबासाहेब शिंदे,कैलास शिंदे,हनूमंत शिंदे, अजिंक्य शिंदे, जितिन शिंदे, शंकर शिंदे, जयराम शिंदे, भारत शिंदे, दत्ता काळे, दिनेश शिंदे, गोकुळ सामसे, सुदर्शन शिंदे, दादा शिंदे, किरन शिंदे,महेश शिंदे,प्रकाश शिंदे, विशाल भांडवलकर, निखील उदमले, संतोष कुरडुले, नवनाथ भांडवलकर, विजय भांडवलकर, पंकज भांडवलकर, गणेश भांडवलकर, विकास सोनवणे, दादा सोनवणे, विलास सोनवणे, किरण सोनवणे, विनोद सोनवणे सह आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.