जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंप सुरु आहेत. राजात सुरु असलेल्या या घडामोडीत आता आणखी एका वेगळ्या बातमीची भर पडली आहे. (Shocking, Financial fraud of four bjp women MLAs in Maharashtra)
राज्यातील चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण आता समोर आले आहे. या धक्कादायक घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
आई आजारी असल्याचे कारण सांगून मुकेश राठोड या तरुणाने महिला आमदारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी पुण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात आमदार मिसाळ यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार श्वेता महाले यांचीही आर्थिक फसवणूक झाली आहे.
मुकेश राठोड या तरुणाने आई आजारी असून तिच्या उपचारासाठी हाॅस्पीटल आणि मेडिकलचे बील देण्यासाठी माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर, श्वेता महाले या महिला आमदारांकडे पैश्यांची मागणी केली होती. या आमदारांनी गुगल पे वरून संबंधित तरूणाला आर्थिक मदत केली होती.
राठोड याने या प्रकरणात आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात बिबवेवाडी पोलिसांनी कारवाई सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे.
सध्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी अधिक दक्ष रहाणे आवश्यक आहे.