जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिंदे गटाने बंडखोरी केल्याच्या आठ दिवसानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. बहुुमत चाचणीला (Majority test) सामोरे न जाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता राज्यात भाजप (bjp) आणि शिंदेसेना यांची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Who will be in the Fadnavis cabinet? These could be potential ministers)
महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadanvis) हे उद्या सरकार स्थापनेचा दावा करु शकतात.नव्या सरकारमध्ये भाजपकडे 29 तर शिंदेसेनेकडे 13 मंत्रीपदे जाऊ शकतात. शिंदेसेनेला 8 कॅबिनेट 5 राज्यमंत्री दिली जाणार आहेत अशीही चर्चा आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी बाकी सर्व गुवाहाटी, भाजपचे आमदार राम शिंदेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा !
देवेंद्र फडणवीस हे 1 किंवा 3 जूलैला मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असणार आहेत.त्याच बरोबर नव्या मंत्रीमंडळाचाही शपथविधी होऊ शकतो.नव्या सरकारमध्ये सेनेच्या सर्व बंडखोर मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे.
अखेेर खर्डा पोलिस स्टेशन कार्यान्वित
नव्या मंत्रिमंडळात भाजपच्या कमी आमदारांना संधी दिली जाणार असेही बोलले जात आहे. तसेच महामंडळावर शिंदे समर्थकांना जास्त संधी जाऊ शकते. नव्या मंत्रिमंडळात शिंदे समर्थकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Ram Shinde | विधानपरिषदेचं तिकीटं कसं मिळालं ? जाणून घ्या राम शिंदे यांच्याच शब्दांत संपूर्ण किस्सा !
नव्या सरकारमध्ये गृह आणि नगरविकास ही महत्वाची खाती नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहू शकतात. तर महसूल आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ शकतात. तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ खाते तर दादा भूसे यांच्याकडे कृषी खाते जाऊ शकते. उदय सामंत यांच्याकडे शिक्षण खाते जाऊ शकते.
Big Breaking | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिला राजीनामा
महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करणारे बच्चू कडू, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांची नव्या सरकारमध्ये बढती होऊ शकते. तर दिपक केसरकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. तर काही अपक्षांना महामंडळे देऊन खूश केले जाणार आहेत.
कर्जतला होणार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश न्यायालय, राज्य सरकारच्या 10 मोठ्या घोषणा !
भाजपचे संभाव्य मंत्री
देवेंद्र फडणवीस,
चंद्रकांत पाटील,
सुधीर मुनगंटीवार,
प्रविण दरेकर,
गिरिश महाजन,
आशिष शेलार,
राम शिंदे,
चंद्रकांत बावनकुळे,
संजय कुटे,
राधाकृष्ण विखे पाटील,
शिंदेसेनेचे संभाव्य मंत्री
एकनाथ शिंदे,
दिपक केसरकर,
उदय सामंत,
दादा भूसे,
संदिपान भूमरे,
गुलाबराव पाटील,
संजय राठोड,
बच्चू कडू,
अब्दुल सत्तार,
शंभूराज देसाई,
प्रताप सरनाईक,