Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय भूकंपाच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदारपणे रंगली आहे. आता हा राजकीय भूकंप कोणत्या राजकीय पक्षात होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाच तासांपासून गायब (अज्ञातस्थळी) असल्याचे वृत्त समोर आले होते. ठाणे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे काही मंत्री व आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही असेही वृत्त समोर आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अश्यातच सोशल मीडियावर मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा शुक्रवारी सायंकाळपासून रंगलेली दिसली. अनेक पत्रकारांनी याबाबतचे ट्विट केल्याने राजकीय भूकंपाच्या बातमीला अधिकच हवा मिळाली.
शनिवारचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा दिवस असणार आहे. शनिवारी खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार का? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.