Breaking News : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे ? केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय, शरद पवार गटाला मोठा धक्का !
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रस पक्ष (Nationalist Congress Party) कोणाचा याचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कुणाचा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) लक्ष लागले होते. अखेर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रस पक्ष (Rashtrwadi Congress) आणि चिन्ह (symbol) हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडेच राहणार असल्याचा निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय राष्ट्रवादीचे (NCP) संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी मोठा धक्का देणारा ठरला आहे.
शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या 63 वर्षाच्या राजकारणातील शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या हातून पक्ष गेला आहे. तसेच चिन्हही गेलं आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा ताबा आणि पक्ष चिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे.निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे आणि केलेले युक्तिवाद यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. ऐन राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता शरद पवार काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता शरद पवार यांच्याकडे फक्त एकच पर्याय उरला आहे. तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणं. पवार गटाकडून आता पक्ष आणि चिन्हासाठी कोर्टात जाण्याची शक्यता आहे. कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल कधी लागेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्हा शिवाय राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे. त्याचा फटका पवार गटाला निवडणुकीत बसण्याची अधिक शक्यता आहे.
दरम्यान, अजित पवार गटाकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आल्याने अजित पवार हेच आता पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत. पक्षाचे सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे जाणार आहे. तसेच पक्षाचे प्रतोदपदही अजित पवार गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागणार आहे. व्हीप न पाळल्यास शरद पवार गटाचे आमदार आणि खासदाही अपात्र होऊ शकतात असं सांगितलं जात आहे.
शरद पवार यांना नवं चिन्ह मिळणार
दरम्यान, शरद पवार गटाला नवं चिन्ह आणि पक्षाचं नवं नाव मिळणार आहे. शरद पवार गटाला पक्षाचे नवे नाव सूचवावे लागणार आहे. तसेच चिन्हही सूचवावे लागणार आहे. हे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर त्याची छाननी करूनच निवडणूक आयोग त्यांना हे चिन्ह आणि नाव देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाच्या शरद पवार गटाला सूचना काय?
राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्याआधी येत्या 28 फेब्रुवारीला राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार गटाला स्वतंत्र मान्यता देण्यात आली आहे. शरद पवार गटाला उद्यापर्यंत पक्षासाठी नाव आणि चिन्ह कळवावी, अशी सूचना देण्यात आली आहे. शरद पवार गटाने पक्षाचं नवं नाव न सूचवल्यास त्यांना अपक्ष म्हणून मान्यता दिली जाईल. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला नवीन चिन्ह आणि नावासाठी तीन पर्याय द्यायचे आहेत.
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या दुपारी चार वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. शरद पवार गटाला उद्या दुपारी चार वाजेपर्यंत नवे चिन्ह आणि नावाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाला पाठवावे लागणार आहेत. त्यापैकी एका नावाचं आणि चिन्हाची निवड निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे.
शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मूभा
शरद पवार गटाला यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असेच दिसत आहे.
निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे आणि केलेले युक्तिवाद यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. ऐन राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता शरद पवार काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही विनम्रपणे स्विकारतो,निर्णयावर प्रतिक्रिया देत अजित पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष उल्लेख आहे.
वघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवारांना नवं चिन्ह शोधावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी देखील सुरु करण्यात आली होती. जर निवडणुक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने नाही आला तर पक्षाच्या चिन्ह काय असणार यासंदर्भात शरद पवार गटाची बैठक देखील पार पडली होती. या बैठकीमध्ये शरद पवारांनी चिन्हाची यादी देखील केली होती. त्यामुळे आता शरद पवार लवकरच त्यांच्या पक्षाचं नव नाव आणि चिन्ह जाहीर करतील असं सांगण्यात आलं आहे. जो न्याय निवडणूक आयोगाने शिवसेना दिला होता, तोच आता राष्ट्रवादीला दिला आहे. त्यामुळे आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शरद पवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
अजित पवारांसोबत
- महाराष्ट्रातील ४१ आमदार
- नागालँडमधील ७ आमदार
- झारखंड १ आमदार
- लोकसभा खासदार २
- महाराष्ट्र विधानपरिषद ५
- राज्यसभा १
शरद पवारांसोबत
महाराष्ट्रातील आमदार १५
केरळमधील आमदार १
लोकसभा खासदार ४
महाराष्ट्र विधानपरिषद ४
राज्यसभा – ३
पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे