Shiv Sena Candidate List : शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर, शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना पुन्हा संधी !
Shiv Sena Candidate List : लोकसभा निवडणुक 2024 साठी शिवसेना पक्षांनी आज आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या मान्यतेने शिवसेनेने आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
जामखेड तालुक्यातील दिघोळचे सुपुत्र खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना शिवसेनेने पुन्हा एकदा शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे असा सामना आता रंगणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये राहुल शेवाळे, संजय मंडलीक, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, राजू पारवे, धैर्यशील माने यांच्या नावांचा समावेश आहे. ही यादी शिवसेनेचे सचिव अजय मोरे यांनी जाहीर केली आहे.
- शिवसेनेचे उमेदवार खालीलप्रमाणे
- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ – राहूल शेवाळे
- कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ – संजय मंडलीक
- शिर्डी लोकसभा मतदारसंघ – सदाशिव लोखंडे
- बुलढाणा लोकसभा मतदारसंघ – प्रतापराव जाधव
- हिंगोली लोकसभा मतदारसंघ- हेमंत पाटील
- मावळ लोकसभा मतदारसंघ – श्रीरंग बारणे
- रामटेक लोकसभा मतदारसंघ – राजू पारवे
- हातकणंगले लोकसभा मतदारसंघ – धैर्यशील माने