Congress | इंधन दरवाढीविरोधात शेवगाव काँग्रेसची सायकल रॅली

केंद्र सरकार विरोधी घोषणांनी शेवगाव शहर दणाणले

शेवगाव : इंधन दरवाढी विरोधात आक्रमक झालेल्या शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी आज १३ रोजी शेवगाव शहरात सायकल रॅलीचे आयोजन करून निदर्शने केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांवर सडकून टीका केली. केंद्र सरकार विरोधी घोषणांनी शहर दणाणून गेले होते.काँग्रेसची ही सायकल रॅली आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर काढण्यात आली होती. (Congress cycle rally against fuel price hike)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या सूचनेनुसार शेवगाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सायकल रॅली काढली होतीपेट्रोल व डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस होत असलेल्या भाववाढीच्या निषेधार्थ आंबेडकर चौक तहसील कार्यालय या रस्त्यावर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. (Congress cycle rally against fuel price hike)

काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.अमोल फडके यांनी केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या धोरणाचा चांगला समाचार घेण्यात आला. केंद्र सरकारने थोडीशी लाज बाळगून भाववाढ रद्द करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. (Congress cycle rally against fuel price hike)

 Congress cycle rally against fuel price hike
Congress cycle rally against fuel price hike

युवक काँग्रेसचे अध्यक्ष बब्रु वडघने यांनी मे २०१४ पासून मे २०२१ पर्यंत केंद्र सरकारने पेट्रोल वरची एक्साईज ड्युटी ०९ रुपयांवरून ३२ रुपयांवर व डिझेलची एक्साईज ड्युटी ०७ रुपयांवरून २७ रुपयांवर नेली असल्याची गोष्ट उपस्थितांच्या लक्षात आणून दिली. युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, सेवादलाचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब शिंदे, महेश काटे आदींनी केंद्र सरकारच्या भाववाढी विरोधातील भावना यावेळी व्यक्त केल्या. (Congress cycle rally against fuel price hike)

यावेळी शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.अमोल फडके यांच्यासह नगरसेवक भाऊसाहेब कोल्हे, सेवादल कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.बाळासाहेब शिंदे, शहराध्यक्ष किशोर कापरे, युवक अध्यक्ष बब्रु वडघने, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, उपाध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे, कोषाध्यक्ष राजू गिरगे, उपाध्यक्ष व पत्रकार निजाम भाई पटेल, महेश निजवे, एन एस यु आय अध्यक्ष महेश काटे, अमोल दहिफळे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू मगर अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष जब्बार भाई शेख, चंदू निकाळजे, बाजीराव अंगारखे, सुरेश निकाळजे आदी उपस्थित होते. (Congress cycle rally against fuel price hike)