( Jamkhed 40 BJP workers resign ) जामखेडमध्ये राजकीय भूकंप : ४० भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे
खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने उसळली संतापाची लाट
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मुंडे भगिनींना (Munde sister) भाजपात सातत्याने डावलले जात असल्याने चिडलेल्या मुंडे समर्थकांनी (Munde supporters) राज्यभरात राजीनामे देण्याचा धडाका लावला आहे. याचे लोण आता जामखेड तालुक्यात धडकले आहे. सोमवारी भाजपच्या ४० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे सोपवल्याने भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. (Jamkhed 40 BJP workers resign)
बीडच्या खासदार डाॅ प्रीतम मुंडे (MP Pritam Munde of Beed) यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्याने मुंडे समर्थकांमध्ये उसळलेली संतापाची लाट थांबायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जामखेड तालुक्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मुंडेप्रेमी कार्यकर्ते व नेत्यांनी मुंडे भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टीने रविवारी दिवसभर मुंडे समर्थकांनी राजीनामा देण्यासंबंधीची मोहीम सोशल मिडीयावर राबवली होती. खर्डा भागातील भाजपाचे युवा नेते बाजीराव गोपाळघरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.(Jamkhed 40 BJP workers resign)
पहा काय आहेत कार्यकर्त्यांच्या भावना ( Jamkhed 40 BJP workers resign)
सोमवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे व भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे (Former Minister Prof. Ram Shinde and BJP's South District President Arun Munde) यांच्या उपस्थितीत जामखेड कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे सोपवले आहेत.(Jamkhed 40 BJP workers resign)
या भाजप कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे ( Jamkhed 40 BJP workers resign)
राजीनामा देणाऱ्यांमध्ये पंचायत समिती सदस्य भगवान मुरूमकर, विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड प्रविण सानप, ओबीसी सेल जिल्हा कार्यकारणी सदस्य बाजीराव गोपाळघरे,ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस काशीनाथ ओमासे, वैजीनाथ पाटील, संतोष पवार, नानासाहेब गोपाळघरे,अनिल लोखंडे, डाॅ सोपान गोपाळघरे,दिपाली गर्जे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दिपाली गर्जे,राजेंद्र ओमासे, उध्दव हुलगुंडे, बाळासाहेब गोपाळघरे, नवनाथ गोपाळघरे, बाळासाहेब गीते, नागनाथ मुरूमकर, महारूद्र महारनवर, मच्छिंद्र गीते, पांडुरंग गर्जे, ईश्वर मुरूमकर, शिवाजी गीते, अशोक महारनवर, हर्षल बांगर, रोहिदास गीते, कविता मनोज राजगुरू भाजपा उपाध्यक्ष, निलावती मच्छिंद्र गीते, संदिप गीते, राहुल ढाळे, सुनिल रंधवे, बाळू दराडे, रंगनाथ गिरी, संतोष माने, मनोज राजगुरू, गहिनीनाथ गीते, अशोक गीते, राजकुमार गोसावी, संदिप जायभाय, एकनाथ गोपाळघरे, अशोक गोपाळघरे, भरत होडशीळ, भागवत सुरवसे , सुभाष जायभाय, सागर सोनवणे, तानाजी फुंदे, सह आदी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे सोपवले आहेत.(Jamkhed 40 BJP workers resign)